“पावसाचा अंदाज चुकला तर हवामान खात्याच्या कार्यालयाला टाळं ठोकू”

| Updated on: Jun 03, 2019 | 10:04 AM

बीड: हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतातला शेतकरी पिकांचे नियोजन करत असतो. मात्र, हवामान विभागाचा सातत्याने अंदाज चुकत असल्याचे सांगत बीडमधील शेतकऱ्यांनी हवामान खात्याला इशारा दिला आहे. यंदा हवामान विभागाचा अंदाज चुकला, तर हवामान विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा बीड जिल्ह्यातील माजलगावच्या शेतकऱ्यांनी दिला. शेतकरी संघटनेचे नेते गंगाभिषण थावरे यांनी याबाबत माहिती […]

पावसाचा अंदाज चुकला तर हवामान खात्याच्या कार्यालयाला टाळं ठोकू
Follow us on

बीड: हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतातला शेतकरी पिकांचे नियोजन करत असतो. मात्र, हवामान विभागाचा सातत्याने अंदाज चुकत असल्याचे सांगत बीडमधील शेतकऱ्यांनी हवामान खात्याला इशारा दिला आहे. यंदा हवामान विभागाचा अंदाज चुकला, तर हवामान विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा बीड जिल्ह्यातील माजलगावच्या शेतकऱ्यांनी दिला. शेतकरी संघटनेचे नेते गंगाभिषण थावरे यांनी याबाबत माहिती दिली.

या सर्व प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनालाही यापूर्वीच निवेदन देऊन हवामान विभागाच्या फसव्या अंदाजाबाबत सांगितलेले आहे. मागील 4-5 वर्षांपासून हवामान विभाग सांगत असलेला अंदाज चुकत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आमच्या मते जर हवामान विभागाने खोटे अंदाज सांगितले नाही, तर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. किमान बी-बियाणांचे तरी पैसे वाचतील, असे मत गंगाभिषण थावरे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याचेही गंभीर प्रश्न तयार झाले आहेत. अशात पावसाचे चुकणारे अंदाज शेतकऱ्याच्या अडचणीत अधिकच वाढ करत आहे. त्यामुळेच संतापलेल्या शेतकऱ्यांनी हवामान खात्याला निर्वाणीचा इशारा दिल्याचे दिसत आहे.