ट्रेनच्या शौचालयामध्ये प्रसुती, धावत्या ट्रेनमध्ये बाळाचा जन्म

| Updated on: Nov 03, 2020 | 10:28 PM

वांद्रे गाजिपूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेने धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली

ट्रेनच्या शौचालयामध्ये प्रसुती, धावत्या ट्रेनमध्ये बाळाचा जन्म
Follow us on

पालघर : वांद्रे गाजिपूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेने धावत्या ट्रेनमध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. वांद्रे गाजिपूर डाऊन ट्रेनच्या एस 12 डब्यात ही प्रसूती झाली. गुडीया विश्वकर्मा असं बाळाला जन्म दिलेल्या महिलेचं नाव आहे. (Women give birth To new born baby in Bandra Gajipur Express)

राजेश विश्वकर्मा आणि त्यांची गर्भवती पत्नी गुडीया हे रविवारी रात्री बांद्रा गाजिपूर या कोव्हिड विशेष ट्रेनमधून उत्तर प्रदेश येथील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. वांद्रे येथून गाडी सुटल्यानंतर विरार स्थानक येताच गुडीया यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या.

गुडिया विश्वकर्मा यांना वेदना सुरू झाल्यानंतर त्यांनी थेट ट्रेनच्या शौचालयांमध्ये जाऊन बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केला. पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही बाब कळाल्यानंतर त्यांनी या रेल्वेला पालघर येथे थांबा देण्याचे निश्चित केले आणि रात्री 12.30 च्या सुमारास ट्रेनला पालघर स्थानकावर थांबवण्यात आली.

त्याआधी पालघर रेल्वे स्थानक प्रशासनाने बालरोग तज्ञ व स्त्री रोगतज्ञ यांना पाचारण केले. वैशाली नर्सिंग होमचे डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी या ट्रेनमधील महिलेच्या प्रसूत झालेल्या बाळाला प्रसुतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करत महिलेसह बाळाला आपल्या दवाखान्यात दाखल केले. यावेळी रुग्णवाहिका ही सज्ज होती. डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी औदार्य दाखवत या महिलेकडून एकही रुपया न घेण्याचं ठरवले.

(Women give birth To new born baby in Bandra Gajipur Express)

संबंधित बातम्या

सासऱ्यांच्या अंत्यविधीला जाताना सुनेची प्रसुती, धावत्या ट्रेनमध्ये बाळाचा जन्म

लोकलमध्ये महिलेला जुळे, एका बाळाचा जन्म सफाळेत, दुसऱ्याचा पालघरमध्ये