डोनाल्ड ट्रम्प यांना जिनपिंग यांची धमकी, चीनचं अमेरिकेला विध्वंसक युद्धाचं आव्हान?

| Updated on: Sep 05, 2020 | 10:27 PM

दबावतंत्राच्या जीवावर विस्तारवादी स्वप्न सत्यात उतरवू पाहणारा हेकेखोर चीन भारतीय शूरवीरांचं शौर्य पाहून घाबरला आहे. बिथरलेला चीन आता थेटपणे अमेरिकेला धमकी देतोय (Xi Jinping Challenge US).

डोनाल्ड ट्रम्प यांना जिनपिंग यांची धमकी, चीनचं अमेरिकेला विध्वंसक युद्धाचं आव्हान?
Follow us on

बीजिंग (चीन) : सध्या चक्रव्युहात फसलेला चीन तडफडतोय (Xi Jinping Challenge US). क्वॉड या चीनविरोधी समुहात अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि तैवानसह नवनव्या देशांची भर पडत आहे. या देशांच्या चक्रव्युहात धोकेबाज चीन अडकला आहे. त्याच्या शब्दा-शब्दातून भीती प्रतिबिंबीत होतेय. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रत्येक वाक्यातून ती भीती अधोरेखीत होत आहे (Xi Jinping Challenge US).

दबावतंत्राच्या जीवावर विस्तारवादी स्वप्न सत्यात उतरवू पाहणारा हेकेखोर चीन भारतीय शूरवीरांचं शौर्य पाहून घाबरला आहे. बिथरलेला चीन आता थेटपणे अमेरिकेला धमकी देतोय. खरंतर हा चीनचा भ्रम आहे. कारण भारतीय शूरवीर सैनिक स्वत: जीवावर लाल सेनेला धूळ चारण्याची हिंमत ठेवतात. पण, गोंधळलेला चीन अमेरिकेला विध्वंसक युद्धासाठी आव्हान देऊ लागला आहे.

अमेरिकेच्या अग्निबाणांनी चीन जळून खाक होऊ शकतो. चीन असा काही उद्ध्वस्त होईल की, जिनपिंग यांचा थरकाप उडेल. चीनचा माज आणि जिंपनिंग यांचं विस्तारवादी धोरण यामुळे चीनचा सर्वनाश होऊ शकतो.

हेही वाचा : चिनी विमानाचा सर्वनाश, दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांना हायअलर्ट

चीननं अमेरिकेला विध्वंसक युद्धासाठी आव्हान देण्याची काही कारणं आहेत. चीनसोबत युद्धजन्य स्थितीत भारतासाठी अमेरिकेनं 3 बॉम्ब वर्षाव करणारे जेट डियागो गार्सिया नौसेना तळावर तैनात केले आहेत. समुद्रात सातत्यानं अमेरिका भारतीय नौसेनेसोबत युद्धसराव करतेय.

गलवानच्या घटनेत अमेरिकेनं भारतीय सैनिकांचं उघड समर्थन केलं आहे. चीनविरोधात क्वॉड स्थापनेत अमेरिकेनं पुढाकार घेतला. चीनी अ‍ॅप्सविरोधात मोदी सरकारच्या कारवाईला जोरदार समर्थन केलं. चीनच्या विस्तारवादी नीतीविरोधात अमेरिकेनं जगाला एकजूट होण्याचं आवाहन केलं.

LAC वर ड्रॅगनला जागं करण्यासाठी जिनपिंग वारंवार अमेरिकेला जबाबदार ठरवत आहेत. विश्वशांतीला आव्हान बनलेल्या चीनविरोधात भारताचं पाऊल आणि त्याला अमेरिकेचं उघड समर्थन चीनला अडचणीत आणत आहे.

अमेरिकेच्या समर्थनामुळे भारतीय शूरावीरांच्या शक्तीत भर पडली आहे. परिणामी चीनचं विस्तारवादी धोरण अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे चीनचा अंत जवळ आल्याचं स्पष्ट आहे. चीनकडून वारंवार इशारे देऊनही अमेरिका LAC पासून दूर जात नसल्यानं, चीनच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात तैवान आणि भारताविरोधात शत्रूत्व ओढवून घेतल्यानं, आता चीनची उलटी गिनती सुरु झालीय, एवढं मात्र निश्चित!

संबंधित बातम्या :

तैवानने चीनचं विमान पाडल्याची चर्चा, घुसखोरीला रोखठोक उत्तर, अधिकृत घोषणेकडे लक्ष

चिनी लष्कराची पुन्हा आगळीक, पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन, भारतीय सैनिकांचे सडेतोड उत्तर