ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्यापेक्षा उपाशी राहू, ‘येवले चहा’चे संचालक भावनावश

| Updated on: Jan 31, 2020 | 7:58 AM

'मराठी उद्योजकाला जाणूनबुजून मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे' असा आरोप 'येवले अमृततुल्य चहा'चे संचालक नवनाथ येवले यांनी केला.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्यापेक्षा उपाशी राहू, येवले चहाचे संचालक भावनावश
Follow us on

पुणे : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून पैसे कमवण्यापेक्षा आम्ही उपाशी राहू. कोणाच्याही अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत, अशी भावनिक प्रतिक्रिया ‘येवले अमृततुल्य’चे संचालक नवनाथ येवले यांनी (Yewale Amruttulya Chaha Director ) दिली आहे. अल्पावधीतच ‘चहाप्रेमीं’मध्ये प्रसिद्ध झालेला येवले अमृततुल्य चहा ‘एफडीए’च्या कारवाईमुळे चर्चेत आहे.

येवले चहामध्ये मेलामाईन असल्याचा ठपका अन्न आणि औषध प्रशासनाने ठेवला आहे. त्यानंतर येवले चहाबद्दल विविध माध्यमातून चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर ‘मराठी उद्योजकाला जाणूनबुजून मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे’ असा आरोप नवनाथ येवले यांनी केला.

‘अन्न आणि औषध प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची न्यायालयीन कारवाई अजूनपर्यंत आमच्यावर झालेली नाही, किंवा त्या प्रकारचे कोणतेही कारवाईचे पत्र आम्हाला मिळालेलं नाही’ अशी माहिती नवनाथ येवले यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

येवले चहाला लाल रंग का? केंद्रीय प्रयोग शाळेने शोधून काढलं

चुकीच्या बातम्यांचा परिणाम व्यवसायावर तर होतोच, त्याबरोबर कामगार वर्गावर आणि त्यांच्या कुटुंबावरही होतो, याकडेही नवनाथ येवले यांनी लक्ष वेधलं.

येवले चहामध्ये भेसळ असल्याचं केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात समोर आलं होतं. जप्त मालाचा पहिला अहवाल चांगला आला होता. मात्र दुसऱ्या अहवालामध्ये सिथेंटिक फूड कलर आढळून आला होता. या फूड कलरमुळे चहाला लाल रंग येतो, असा अहवाल केंद्रीय प्रयोगशाळेने दिला होता.

पुण्यातून ‘येवले अमृततुल्य चहा’च्या शाखांना सुरुवात झाली. अल्पावधीतच पुणेकर चहाप्रेमींच्या मनात ‘येवले अमृततुल्य चहा’ने स्थान मिळवलं. पुणेकरांनी गौरवलेला चहा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला. कोणत्याही वेळी चहाची तल्लफ भागवणारे ‘अमृतपेय’ पिण्यासाठी ‘चहा’त्यांची गर्दी उसळते.

‘येवले चहा’च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. कोंढवा भागातील कंपनीवर एफडीएने मागे छापे टाकले होते. तेव्हा चहाचं उत्पादन आणि विक्रीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या होत्या. आरोग्यास अपायकारक ‘मेलानाईट’ पदार्थ वापरल्याच्या संशयातून ही कारवाई त्यावेळी करण्यात आली होती.

दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दलही ‘येवले चहा’ला नोटीस बजावली हेती. या प्रकरणी ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्यात आली होती. चहा तयार करण्यासाठी मिनरल वॉटर वापरलं जात असून चहामुळे पित्त होत असल्याची जाहिरात केली जात होती.

Yewale Amruttulya Chaha Director