Kitchen Tips : स्वयंपाक करताना या 3 चुका करता म्हणून लवकर संपतो गॅस; सिलिंडर जास्त दिवस टिकण्यासाठी सोप्या टिप्स, जाणून घ्या

कळतपणे आपण स्वयंपाक करताना अशा काही चुका करतो, ज्यामुळे गरजेपेक्षा जास्त गॅस खर्च होतो. या तीन सवयी बदलल्या, तर सिलिंडर लवकर संपण्यापासून मदत होऊ शकते.

Kitchen Tips : स्वयंपाक करताना या 3 चुका करता म्हणून लवकर संपतो गॅस; सिलिंडर जास्त दिवस टिकण्यासाठी सोप्या टिप्स, जाणून घ्या
save kitchen gas tips
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 21, 2026 | 7:45 PM

महागाईच्या काळात घरखर्च सांभाळताना प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवावा लागतो. भाजीपाला, किराणा आणि इतर वस्तूंच्या खर्चासोबत स्वयंपाकाच्या गॅसचाही खर्च वाढतोय. आता सिलिंडर लवकर संपला की पुन्हा बुकिंग करण्याची वेळ येते आणि बजेटचं गणित बिघडतं. पण नकळतपणे आपण स्वयंपाक करताना अशा काही चुका करतो, ज्यामुळे गरजेपेक्षा जास्त गॅस खर्च होतो. या तीन सवयी बदलल्या, तर सिलिंडर लवकर संपण्यापासून मदत होऊ शकते.

 

Loading...

भांडी उघडी ठेवून जेवण शिजवणं

स्वयंपाक करताना अनेक जण भांड्यावर झाकण ठेवत नाहीत. त्यामुळे उष्णता बाहेर पडते आणि पदार्थ शिजायला जास्त वेळ लागतो. परिणामी गॅसही जास्त खर्च होतो. डाळ , भाजी, किंवा इतर पदार्थ शिजवताना योग्य झाकण वापरा. यामुळे वाफ आत राहते आणि पदार्थ लवकर शिजण्यास मदत होते. मात्र दूध किंवा उकळून बाहेर येऊ शकणारे पदार्थ शिजवताना लक्ष ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

 

गरज नसताना मोठ्या आचेवर स्वयंपाक करणं

काही जणांना वाटतं की गॅसची आच जितकी मोठी,तितका पदार्थ लवकर शिजेल. पण प्रत्येक पदार्थासाठी मोठी आच आवश्यक नसते. भांड्याच्या तळाबाहेर गॅस जात असेल तर उष्णतेचा काही भाग वाया जाऊ शकतो.त्यामुळे भांड्याच्या आकारानुसार आच ठेवा. पाणी उकळल्यानंतर किंवा पदार्थांला उकळी आल्यानंतर गरजेनुसार आच कमी केल्यास गॅसचा वापर कमी होण्यास मदत होते.

स्वयंपाकाची तयारी न करता गॅस सुरू करणं

गॅस सुरू केल्यानंतर भाजी चिरणं, मसाले शोधणं किंवा इतर साहित्य तयार करणं ही अनेक घरांमध्ये दिसणारी सवय आहे. अशा वेळी गॅस सुरू असतो. पण प्रत्यक्ष स्वयंपाक पुढे जातच नाही. त्यामुळे आधीच भाजी चिरून घ्या. मसाले आणि इतर साहित्य जवळ ठेवा. सगळं तयार झाल्यानंतरच गॅस सुरू करा. यामुळे स्वयंपाकात लागणारा वेळही कमी होईल आणि गॅसही वाचेल.

गॅस वाचवण्यासाठी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रेशर कुकरमध्ये शिजवता येणारे पदार्थ योग्य पद्धतीने कुकरमध्ये शिजवा आणि गॅसची ज्योत निळी आहे का, हे वेळोवेळी तपासा. ज्योत पिवळी दिसत असेल किंवा शेगडी नीट काम करत नसेल तर तपासून घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us