वाढत्या वयातही दिसा चिरतरुण, या आहाराचा करा समावेश

| Updated on: Feb 19, 2022 | 12:29 PM

वय वाढते त्यानुसार आपल्या शरीरातही अनेक वेगवान बदल होणे स्वाभावीक असतात. वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीराचा आकार बिघडत असतो. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात, शरीर अशक्त वाटू लागते. परंतु वयाच्या पन्नाशीनंतरही काही सूपरफूडच्या माध्यमातून तुम्ही फिट दिसू शकतात.

वाढत्या वयातही दिसा चिरतरुण, या आहाराचा करा समावेश
fruits-vegetables
Follow us on

मुंबई : आपण दीर्घकाळ चिरतरुण रहावे, वाढत्या वयातही (Increasing age) आपल्या चेहर्यावरील चमक (Glow On The Face) शाबूत रहावी, असे सर्वांनाच वाटत असते. खासकरुन महिला याबाबत प्रचंड जागृत असतात. वाढत्या वयात शरीरात अनेक बदल होतात. आपले शरीर आपल्याला वाढत्या वयाची नेहमी जाणीव करुन देत असते. वयाच्या पन्नाशीनंतर, आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्‍यक असते. पूर्वीप्रमाणे तंदुरुस्त राहणे हे आव्हान असते. वय वाढल्याने आपले चयापचय मंदावते. शरीरात पूर्वीप्रमाणे उर्जा राहत नाही. परिणामी, आपल्या शरीराचा आकार बिघडत असतो. पोटाचा घेर वाढत असतो. त्वचेवर सुरकुत्या (Wrinkles) दिसू लागणे स्वाभाविक असते. परंतु आपण आपल्या आहारात काही बदल केल्यास आपण पन्नाशीतही फिट राहू शकतो.

असा घ्या नाश्‍ता

आहारतज्ञ पैनी लॉरियर यांच्या मते, जर आपण सकाळी नाश्ता केला नाही, तर याचे शरीरावर अनेक परिणाम होतात. वाढत्या वयात शरीरात प्रथिनांची कमतरता असते, ज्याचा आपल्या चयापचय आणि एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दररोज नाश्‍ता केल्याने आपल्या शरीराला पुरेसे प्रथिने मिळतात. त्यामुळे सकाळी नक्की नाश्‍ता करावा. सकाळच्या आहारात फायबर, प्रोटीन आणि कमी साखर असलेल्या गोष्टींचा समावेश असावा.

फास्टफूड टाळा

वाढत्या वयात फास्टफूड तसेच प्रक्रिया केलेले अन्न अत्यंत धोकेदायक ठरत असतात. या अन्नघटकांमध्ये प्रचंड प्रमाणात साखर, चरबी आणि जास्त मीठ असते, त्यामुळे याचा शरीरावर अत्यंत घातक परिणाम होत असतो. या गोष्टींना टाळून आपण शरीरातील कॅलरीज झपाट्याने कमी करू शकतो. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत मिळत असते. ‘न्यूट्रिशन जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, प्रक्रिया केलेले अन्न उच्च रक्तदाब, हृदयरोग तसेच रक्तवाहिन्यासंबंधी रोगांना कारण ठरत असते.

फळे आणि भाज्या खाव्यात

आपल्या रोजच्या आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. अनेक तज्ज्ञ या आहाराचा समावेश करण्याचा सल्ला देत असतात. ताजी फळे आणि भाज्या पन्नाशीनंतर वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. कमी कार्बोहायड्रेट आणि जास्त फायबर असलेले फळे शरीरासाठी वरदानापेक्षा कमी नसतात. आपली भूक नियंत्रीत करण्यात यांची महत्वाची भूमीका असते. फळे आणि भाज्यांचा रस पिण्याऐवजी ते संपूर्ण खाल्ल्याने शरीराला अधिक फायदा होतो.

प्रोटीनचा समावेश करा

आहारतज्ज्ञ ब्लांका गार्सिया यांच्या मते, लोकांनी सकस आहार घेतला पाहिजे. वनस्पतींवर आधारीत असलेल्या प्रोटीनचा आपल्या आहारात वापर करण्याचा सल्ला त्या देतात. बदाम, बिया आणि बीन्स यांसारखे वनस्पतींपासून तयार स्नॅक्स खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होउन शरीराला एक संतुलित आहार मिळत असतो.

संबंधित बातम्या :

द्राक्षं आवडतात म्हणून अतिरेक नको, शरीरावरील दुष्परिणाम माहितीयं का?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नेमकी कोणती डाळ खायची? उत्तर इथे मिळेल!

मुगाच्या डाळीचे ‘हे’ चमत्कारिक फायदे माहीत आहेत? Weight Loss यासह विविध समस्या दूर करण्यास मदत!