AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुगाच्या डाळीचे ‘हे’ चमत्कारिक फायदे माहीत आहेत? Weight Loss यासह विविध समस्या दूर करण्यास मदत!

Moong dal benefits for health : वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) अनेक घरगुती उपाययोजना केले जात असतात. अनेकजण डाएट (Diet) प्लानदेखील बदलत असतात. परंतु आपल्या घरातीलच अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतील.

मुगाच्या डाळीचे 'हे' चमत्कारिक फायदे माहीत आहेत? Weight Loss यासह विविध समस्या दूर करण्यास मदत!
मूग डाळ/प्रातिनिधिक छायाचित्र
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 17, 2022 | 2:56 PM
Share

Moong dal benefits for health : सध्याच्या काळात अनेकांना आपले वजन (Weight) नियंत्रित असावे, असे वाटत असते. खासकरून महिला वजनाच्या बाबतीत अत्यंत जागरूक असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले जात असतात. अगदी जीमपासून ते रोजच्या आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश असावा इतपर्यंत सर्व काही केले जाते. परंतु वजन कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातीलच काही वस्तू आहेत, ज्या आपल्याला मदत करतील. मूग डाळ (Moong dal) किंवा हिरव्या मसूरमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि तांबे यांसारखी खनिजे असतात. त्यात फोलेट, फायबर आणि व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असण्यासोबतच उच्च दर्जाचे प्रोटीन (Protein)देखील असते. यामध्ये व्हिटॅमिन बी असते. अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असताना डॉक्टर अनेकदा या डाळीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. मtग डाळ शरीरासाठी ऊर्जा निर्माण करते. फॉलिक अॅसिड आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या आहारात मूग डाळ समाविष्ट करणे खूप फायदेशीर आहे.

हृदय निरोगी राहते

या डाळीचे सेवन आठवड्यातून एकदा तरी करावे. त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हे स्नायूंच्या आकुंचनाला प्रतिबंध घालत असल्याने त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी मोड आलेल्या मूग डाळीचा नेहमी आहारात समावेश करावा.

वजन कमी होते

‘कोलीसिस्टोकाइनिन’ या हार्मोनचे कार्य सुधारण्यासाठी मूग डाळ खूप चांगली आहे. हा हार्मोन आपल्याला पोट भरल्याचे समजते. या हार्मोनमुळे पचनक्रियादेखील सुधारत असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दुपारच्या जेवणात भाताबरोबर किंवा पोळीसोबत मुगाच्या दाळीचे सेवन चांगले मानले जाते. सकाळी मोड आलेल्या मुगाची उसळ नाश्‍त्यासाठी उत्तम असते.

मधुमेह

मूग डाळ कमी ग्लायसेमिक इंडेक्ससाठी ओळखली जाते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. मोड आलेल्या हिरव्या मूगाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, यातून रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढत असते.

पचनसंस्था निरोगी राहते

मूग डाळ आतड्यात ब्युटीरेट नावाचे फॅटी अॅसिड तयार करण्यास मदत करते. हे आपल्या आतड्यांसाठी खूप चांगले आहे. यामध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

रक्ताभिसरण सुधारते

मुगाच्या डाळीचे सेवन रक्ताभिसरणासाठी खूप चांगले आहे. यामध्ये लोह असते जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते. हे अॅनिमियापासून बचाव करण्यास देखील मदत करते.

प्रतिकारशक्ती वाढवते

मूग डाळीमध्ये विशेष गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक पेशी मजबूत ठेवतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी आणि फ्लूची समस्या दूर राहण्यास मदत होते, त्यामुळे नेहमी आपल्या आहारात मोड आलेल्या मुगाच्या डाळीचा समावेश नक्की करावा.

आणखी वाचा :

मटण म्हणलं की तोंडाला पाणी सुटलंच समजा, पण उस्मानाबादी मटण म्हणजे… आss..हाss..हाss..!

लग्नानंतर किचनमध्ये पहिलीच ‘एंट्री’… घाबरु नका, ही ‘स्वीट डिश’ ट्राय करा

Diabetes Care : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ मसाल्यांचा वापर करा आणि निरोगी राहा!

Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल