Weight Loss : मनुके आणि गूळ वजन कमी करण्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा !

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहार आहे. आपण आहारात नेमके काय खातो यावर आपले वजन ठरलेले असते.

Weight Loss : मनुके आणि गूळ वजन कमी करण्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा !
मनुके आणि गूळ

मुंबई : वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहार आहे. आपण आहारात नेमके काय खातो यावर आपले वजन ठरलेले असते. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक आहारात कमी कॅलरीयुक्त अन्न घेतात. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक खास खाद्य सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वाढलेले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. (Raisins and jaggery are beneficial for weight loss)

-वजन कमी करण्यासाठी गूळ आणि मनुके खाणे खूप फायदेशीर आहे. वजन कमी करताना गोड पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. त्यात साखरेचाही समावेश आहे. साखरेमध्ये कॅलरी आणि पोषक द्रव्ये जास्त असतात. यामुळे आपण साखरेऐवजी गुळाचा आहारात समावेश केला पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

-गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात.

-मनुक्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील साखर नियंत्रित राहते. मनुक्यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि लोह असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मनुका रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात आणि अशक्तपणा टाळण्यास मदत करते. त्यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते आणि बद्धकोष्ठता रोखण्यास मदत होते.

-मनुके हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. मनुक्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. याशिवाय हे कोलेस्टेरॉलचे नियंत्रण देखील करते आणि हृदयाला अनेक समस्यांपासून वाचवते. विशेष म्हणजे मनुक्याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

या गोष्टी लक्षात ठेवा

1. गूळ आणि मनुका हे दोन्ही वजन कमी करण्यासाठी चांगले आहेत, परंतु जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर ते वजन वाढू शकते. म्हणून याचे प्रमाणात सेवन केले पाहिजे.

2. आपल्याला मधुमेह असल्यास, आपल्या आहारात दोन्ही गोष्टींचा समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3. वजन कमी करण्यासाठी, नियमितपणे व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम दोन्ही महत्वाचे आहे.

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Raisins and jaggery are beneficial for weight loss)