AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : शुक्रवारच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका ही वस्तू, लक्ष्मी माता होते नाराज, घरात येईल गरिबी

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित असतो. प्रत्येक वाराचे नियम वेगळे असतात. काही विशिष्ट गोष्टी या विशिष्ट वारी खरेदी करणं अशुभ मानलं जातं, अशाच एका वस्तुबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : शुक्रवारच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका ही वस्तू, लक्ष्मी माता होते नाराज, घरात येईल गरिबी
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 09, 2026 | 10:09 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित असतो. जसं की रविवार हा सूर्य देवतेचा वार आहे. सोमवार हा भगवान महादेव यांचा वार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार आहे. शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते तसेच देवीचं व्रत देखील केलं जातं. लक्ष्मी मातेची सदैव आपल्यावर कृपा राहावी यासाठी अनेक जण शुक्रवारच्या दिवशी विविध उपाय देखील करतात. मात्र दुसरीकडे हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा काही चुका आहेत, ज्या जर तुम्ही शुक्रवारी केल्या तर त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी माता नाराज होते. घरात गरिबी येऊ शकते.वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या शुक्रवारच्या दिवशी खरेदी करू नयेत, जर या गोष्टी तुम्ही शुक्रवारी खरेदी केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते, तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तुम्हाला विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेऊयात ज्या शुक्रवारी खरेदी करू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

वास्तुशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी कधीही झाडू खरेदी करू नये. असं मानलं जातं की जर तुम्ही शुक्रवारी झाडू खरेदी केला तर लक्ष्मी माता नाराज होते. तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतात. कारण वास्तुशास्त्रामध्ये झाडूचं विशेष महत्त्व आहे. झाडू हे केवळ स्वच्छतेचं साधन नाही तर त्याचा संबंध हा लक्ष्मी मातेशी असतो. त्यामुळे झाडू खरेदी करताना काही गोष्टी या लक्षात ठेवाव्या लागतात. शुक्रवारी झाडू खरेदी करू नये असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

झाडू कधी खरेदी करावा?

वास्तुशास्त्रानुसार शुक्रवारचा दिवस सोडून आणि शुक्ल पक्ष सोडून तुम्ही कधीही झाडू खरेदी करू शकता. मात्र जर तुम्ही शुक्रवारी किंवा शुक्ल पक्षात झाडूची खरेदी केली तर ते अशुभ माण्यात येतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा