Couple tips : जीवनात मुलाच्या प्रवेशानंतर जोडप्यामध्ये येते अंतर, ‘या’ टिप्स पडू शकतात उपयोगी!

मुलाची काळजी घेण्यासाठी सक्रिय असल्यामुळे जोडपे एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. परंतु, अशा काही टिप्स फॉलो करून, तुम्हीश मुलाच्या जन्मानंतरही तुमचे जीवन थोडे सोपे करू शकता.

Couple tips : जीवनात मुलाच्या प्रवेशानंतर जोडप्यामध्ये येते अंतर, ‘या’ टिप्स पडू शकतात उपयोगी!
जीवनात मुलाच्या प्रवेशानंतर जोडप्यामध्ये येते अंतर
| Edited By: | Updated on: Aug 19, 2022 | 5:52 PM

विवाहित जीवनात मुलाच्या प्रवेशानंतर जीवन पूर्णपणे बदलते. बहुतेक पालकांना (Most parents) त्यांचे जुने आयुष्य मागे सुटल्यासारखे वाटते. त्याचबरोबर कधी कधी नात्यात असे बदल होतात की जोडप्यात दुरावा येतो. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, जबाबदाऱ्या वाढणे. झोप न लागणे, सतत काम करणे आणि नंतर मुलाची काळजी (Child care) घेण्यासाठी सक्रिय असणे. यामुळे जोडप्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत जर नातं सांभाळलं नाही तर समस्या अधिकच वाढतात. नात्यात कडवटपणा (Bitterness in relationship) निर्माण होऊ लागतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात या परिस्थितींना तोंड देत आहात का.. तर, काही सोप्या मार्गांनी नात्यातील अंतर कमी करता येऊ शकते. अशा काही सोप्या टिप्स फॉलो करून, तुम्ही मुलाच्या प्रवेशानंतरही आयुष्य थोडे सोपे करू शकता.

थोडी झोप घ्या

मूल आयुष्यात आल्यानंतर पहिली काही वर्षे पालकांची झोपेची दिनचर्या विस्कळीत होते. झोप न मिळाल्याने मनाला चैन पडत नाही आणि तणावामुळे जोडप्यात भांडणे सुरू होतात. तुम्ही कितीही व्यस्त असाल, पण दररोज किमान 7 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. पहिली तीन वर्षे मुले रात्री जागरण करतात. त्यामुळे जोडप्याने पुरेश्या झोपेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.

फिरण्यासाठी वेळ काढा

मुलाचा आयुष्यातला प्रवेश, मग त्याची जबाबदारी, कामाचा ताण, या सर्व गोष्टी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला त्रास देऊ शकतात. मनाला रिलॅक्स वाटण्यासाठी तुम्ही रोमिंगचा विचार करून पहा. संशोधनात असेही समोर आले आहे की, प्रवास केल्याने हृदय आणि मन दोन्ही शांत होतात. एका आठवड्यात किंवा 15 दिवसांत तुमच्या कुटुंबासोबत बाहेर फिरायला जा.

नकारात्मक होऊ नका

नवीन पालक मुलाची जबाबदारी पार पाडण्याबद्दल इतके अस्वस्थ होतात की, ते नकारात्मक स्वभाव स्वीकारतात. यामुळे ते प्रत्येक छोट्या गोष्टीवरून भांडू लागतात आणि जास्त प्रतिक्रियाही देतात. भांडणामुळे नात्यातील नकारात्मकतेमुळे अंतर आणखी वाढू शकते. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा आणि भांडण करण्याऐवजी संवादाने परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करा.