Dark Circles Removal : डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांचा त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय करा! 

| Updated on: Dec 12, 2021 | 11:14 AM

मुरुम आणि डाग याशिवाय डोळ्यांखालील काळी वर्तुळे सर्वात त्रासदायक असतात. काळ्या वर्तुळांवर घरगुती उपाय देखील करता येतात. सध्याच्या तणावाच्या जीवनशैलीमध्ये डोळ्यांखाली काळी वर्तुळे होणे हे खूप सामान्य आहे. अगदी लहान वयातही होऊ शकतात.

Dark Circles Removal : डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांचा त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय करा! 
डोळ्यांखालील काळी वर्तुळे
Follow us on

मुंबई : मुरुम आणि डाग याशिवाय डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark Circles) सर्वात त्रासदायक असतात. काळ्या वर्तुळांवर घरगुती उपाय देखील करता येतात. सध्याच्या तणावाच्या जीवनशैलीमध्ये डोळ्यांखाली काळी वर्तुळे होणे हे खूप सामान्य आहे. अगदी लहान वयातही होऊ शकतात. काळ्या वर्तुळांची समस्या दूर करण्यासाठी आपण काही खास घरगुती उपाय केले पाहिजेत.

– रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्या आणि डोळ्यांखाली मसाज करा. बदाम तेल हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्त्रोत आहे. व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

-एक काकडी सुमारे 30-40 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. ते काढा आणि त्याचे 2 जाड तुकडे करा. डोळे बंद करा आणि नंतर डोळ्यांच्या काळ्या वर्तुळांवर ठेवा. सुमारे 10-15 मिनिटे तसेच ठेवा. काकडीचे तुकडे काढून टाका आणि थंड पाण्याने डोळे धुवा.

-2 कापसाचे गोळे घ्या आणि नंतर थंड गुलाब पाण्यात भिजवा. डोळ्यांवर अशा प्रकारे लावा की त्यामुळे काळी वर्तुळे पूर्णपणे झाकली जातील. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हे सतत आपण एक महिना केले तर डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

-टोमॅटोच्या रसामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. या रसाचे मिश्रण काळ्या वर्तुळांवर हलक्या हातांनी लावा. 10-12 मिनिटे सोडा. थंड पाण्याने स्वच्छ धुवा. काही आठवडे दिवसातून दोनदा हा उपाय करा. यामुळे काळ्या वर्तुळ्यांची समस्या दूर होण्यास मदत होईल.

-काकडी आणि गुलाब पाण्याने काळी वर्तुळे आणि फुगलेल्या डोळ्यांपासून सुटका मिळवू शकते. काकडी किसून त्याचा रस पिळून घ्या. त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..