Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
वजन कमी करण्यासाठी काकडी आणि ओव्याचे पाणी पिणे फायदेशीर आहे. हे आपला चयापचय वाढविण्यात मदत करते. जर नियमितपणे रात्री झोपण्याच्या अगोदर आपण काकडी आणि ओव्याचे पाणी पिले तर चरबी कमी होते. काकडीत खूप कमी कॅलरी असतात. यात व्हिटॅमिन ए, बी आणि केसारखे पोषक घटक असतात.

बर्‍याच उपायांचा प्रयत्न करून कंटाळला असाल, तर झोपण्याच्या आधी ‘ही’ निरोगी पेये नक्की प्या. यामुळे नक्कीच तुमचे वजन कमी होईल.

Harshada Bhirvandekar

|

Feb 24, 2021 | 12:11 PM

मुंबई : वाढत्या वजनापासून मुक्त होण्यासाठी आपणच नाही तर, आपल्यासारखे अनेक लोक अथक प्रयत्न करत असतात. आपण देखील बर्‍याच उपायांचा प्रयत्न करून कंटाळला असाल, तर झोपण्याच्या आधी ‘ही’ निरोगी पेये नक्की प्या. यामुळे नक्कीच तुमचे वजन कमी होईल. खास गोष्ट अशी आहे की, वजन कमी करण्यासाठी आपल्याला व्यायाम करणे किंवा तासनतास जिममध्ये घाम गाळण्याची आवश्यकता नाही. चला तर, जाणून घेऊया झोपेच्या आधी अशी कोणती पेय प्यावीत, ज्याने आपण सहजपणे वाढत्या वजनापासून मुक्त होऊ शकता…(Weight loss drinks for easy losing fat)

कॅमोमाइल टी

वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा सर्वोत्तम पेय मानला जातो. आपल्यालाही आपले वाढते वजन नियंत्रित करायचे असेल, तर रात्री झोपेच्या आधी कॅमोमाइल चहा पिणे विसरू नका. असे केल्याने केवळ तुमचे वजनच नियंत्रित होणार नाही, तर तुम्हाला झोपही चांगली मिळेल. अनेक आरोग्य अभ्यासानुसार असे सुचविले गेले आहे की, ही कॅमोमाइल टी साखरेची पातळी नियंत्रित करून, वजन कमी करण्यास मदत करते.

दालचिनी युक्त चहा

कमी वेळात वजन कमी करायचे असेल, तर दालचिनी युक्त चहाचे सेवन करण्यास सुरुवात करा. दालचिनी चहा वजन नियंत्रणासाठी सर्वोत्तम नैसर्गिक पेय मानला जातो. या चहामध्ये अनेक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुणधर्मांसह चयापचय वाढवणारा गुणधर्म देखील आहे. ज्यामुळे तो एक चांगला डीटॉक्स पेय देखील बनतो. दालचिनी चहाचे सेवन केल्यास चरबी लवकर बर्न होण्यास मदत होते (Weight loss drinks for easy losing fat).

मेथीचा चहा

वाढत्या वजनाने आपल्याला झोपेचीही समस्या उद्भवत असल्यास मेथीचा चहा घ्या. तसेच, जर एखाद्या दिवशी आपल्याला असे वाटले की, आपण आपल्यापेक्षा आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाल्ले आहे, तर हा चहा आपल्याला सुधारित पचनासह अन्न पचविण्यात देखील मदत करेल. मेथीचा चहा बनवण्यासाठी प्रथम एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी भिजवा. सकाळी ही मेथी गाळून घ्या व पाणी वेगळे करुन, रात्री कोमट करून झोपण्यापूर्वी हे पाणी प्या. नियमित सेवन केल्याने तुम्ही वजन लवकर नियंत्रित होईल.

हळद दुध

हळदीचे दूध नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर असते. लोक हे सहसा व्हायरल किंवा संसर्ग टाळण्यासाठी वापरतात, परंतु फारच कमी लोकांना हे माहित आहे की हळदीचे दुध तुमचे वजन देखील कमी करते कारण त्यात अँटीऑक्सिडेंट असतात, जे आपले वजन नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Weight loss drinks for easy losing fat)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें