Weight Loss Tips | रात्रीच्या वेळी ‘या’ पदार्थांचे सेवन करा, वजन नियंत्रणासाठी ठरेल लाभदायी!

धकाधकीचे आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, सतत वजन वाढणे या अगदी सामान्य समस्या झाल्या आहेत.

Weight Loss Tips | रात्रीच्या वेळी ‘या’ पदार्थांचे सेवन करा, वजन नियंत्रणासाठी ठरेल लाभदायी!
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 2:03 PM

मुंबई : धकाधकीचे आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, सतत वजन वाढणे या अगदी सामान्य समस्या झाल्या आहेत. अशावेळी आपण वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतो. परंतु, कधीकधी असे घडते की, आपल्याच काही सवयी आपले हे प्रयत्न निष्फळ ठरवतात. आपण काय खातो, विशेषत: रात्रीच्या आहाराचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी निरोगी आहार घ्यावा, जेणेकरून आपल्याला पुरेसे पोषण मिळेल आणि आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी देखील साठणार नाही. आज आम्ही तुम्हाला असेच काही पदार्थ सांगत आहोत, जे रात्रीच्या वेळी खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहीलच, पण शरीरावरील अतिरिक्त चरबीही कमी होईल (Weight loss tips include this food in your dinner for weight loss).

ग्रीन टी

अन्न खाल्ल्यानंतर एक कप ग्रीन टीचे सेवन केवन आपळे अन्न पचवत नाही, तर हे प्यायल्याने आपले पोटही स्वच्छ राहते. ग्रीन टी प्यायल्यानंतर 5-10 मिनिटे चालणे विसरू नका, अन्यथा पोटात गॅस देखील बनू शकता.

ब्रोकोली

आपल्या आहार योजनेत ब्रोकोलीचा समावेश असलाच पाहिजे. ब्रोकोलीला नेहमी वाफवून खावे. याद्वारे आपले वजन नियंत्रणात राहते आणि त्वचेच्या समस्याही दूर होतात.

चेरी

रात्रीचे जेवणानंतर चेरी खाण्याने आपल्याला चांगली झोप मिळेल. याव्यतिरिक्त चेरी खाल्ल्याने वजन देखील कमी होते. चेरीमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स ओटीपोटात साठलेली चरबी देखील कमी करतात.

बदाम

वजन कमी करण्यासाठी आपल्या आहार योजनेत बदामांचा समावेश करावा. बदाम शरीरासाठी भरपूर पोषक असतात. याव्यतिरिक्त, त्यातील प्रथिने आपल्या स्नायूंची देखील दुरुस्ती करतात. याशिवाय हे बदमांच्या सेवनाने शरीरात चरबीही साठून राहत नाही (Weight loss tips include this food in your dinner for weight loss).

उकडलेले अंडी

शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने पुरवण्यासाठी उकडलेले अंडी खाणे आवश्यक आहे. अंडी शरीरात प्रथिनांची कमतरता दूर करण्याबरोबरच चरबी बर्न करण्यास देखील मदत करतात. जर आपल्याला कुठल्याही अधिकच्या मेहनतीशिवाय वजन कमी करायचे असेल, तर उकडलेली अंडी आहारात नक्कीच सामील करा.

कोरफड

कोरफड आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे एका प्रकारचे औषध मानले जाते, शरीरात जमा होणारी चरबी बाहेर टाकण्यासाठी कोरफड रसाची मदत होते, कोरफड देखील बाजारात सहज मिळू शकेल. जर आधीच कोरफड आपल्या घरात असेल तर आपल्याला परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. कोरफड घा आणि मधून कापा त्यामध्ये असलेला गर काढा. आणि एका काचेच्या पाण्यात मिसळा आणि ठेवा. रात्री झोपायच्या आधी प्या.

हळद दुध

हळदीचे दूध नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर असते. लोक हे सहसा व्हायरल किंवा संसर्ग टाळण्यासाठी वापरतात, परंतु फारच कमी लोकांना हे माहित आहे की हळदीचे दुध तुमचे वजन देखील कमी करते कारण त्यात अँटीऑक्सिडेंट असतात, जे आपले वजन नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Weight loss tips include this food in your dinner for weight loss)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.