Hair Care Tips : पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय करा! 

| Updated on: Nov 18, 2021 | 11:03 AM

केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये खराब जीवनशैली, आहार, जंक फूड, तणाव आणि प्रदूषण इत्यादींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. पालेभाज्या, दही आणि ताजी फळे यांचा आहारात समावेश करावा.

Hair Care Tips : पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी हे 4 सोपे घरगुती उपाय करा! 
केसांची काळजी
Follow us on

मुंबई : केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये खराब जीवनशैली, आहार, जंक फूड, तणाव आणि प्रदूषण इत्यादींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. पालेभाज्या, दही आणि ताजी फळे यांचा आहारात समावेश करावा. याशिवाय काही छोट्या उपायांनीही तुम्ही पांढऱ्या केसांची समस्या दूर करू शकता. हे नेमके कोणते उपाय याबद्दल जाणून घेऊयात.

मेंहदीची पेस्ट

गरम पाण्यात मेंहदी पावडर टाकून चांगले मिसळा. जर तुमचे केस कोरडे असतील तर तुम्ही दहीही घालू शकता. पेस्ट केसांना लावा. गडद रंगासाठी 2-3 तास ​​तसंच राहू द्या, मेंहदीच्या पानांमध्ये असणारा रंग फक्त राखाडी केसांवर उपचार करण्यास मदत करेल असे नाही तर ते मऊ आणि निरोगी देखील करेल.

आवळा आणि शिककाई पेस्ट

आवळा आणि शिककाई केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही आवळा आणि शिकाकाई एकत्र पाण्यात उकळा. लगदा काढा आणि मऊ पेस्ट बनवा. हेअर पॅक म्हणून लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. तुम्ही आवळा आणि शिककाईच्या द्रावणानेही केस धुवू शकता. हे तुमच्या केसांना नैसर्गिक रंग देण्यास मदत करेल.

हिबिस्कस 

हिबिस्कसच्या पाकळ्या गरम पाण्यात उकळा. तुम्ही कोको पावडर आणि कढीपत्ता देखील घालू शकता. पेस्ट संपूर्ण केसांना लावा. केस धुतल्यानंतर केसांचा रंग लाल दिसेल.

कॉफी

पांढरे केस दूर करण्यासाठी आणि केस चमकदार आणि मऊ करण्यासाठी तुम्ही कॉफी वापरू शकता. ग्राउंड कॉफी घ्या आणि त्यात पाणी घालून पेस्ट बनवा. केसांना लावा आणि एक किंवा दोन तास राहू द्या. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

लिंबू आणि मेथी

मेथी दाणे पाण्यात उकळून थंड होऊ द्या. बिया गाळून घ्या आणि केस धुण्यासाठी लिंबाचा रस घाला. जर तुम्ही कोरफड देखील घालत असाल तर तुम्ही सर्व घटकांची पेस्ट बनवू शकता आणि नंतर पॅकच्या स्वरूपात लावू शकता. हा हर्बल हेअर पॅक तुमच्या पांढर्‍या केसांना सुंदर बनवण्यासच मदत करत करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!