Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर! 

| Updated on: Nov 30, 2021 | 10:59 AM

हिवाळ्याचा हंगाम म्हटंले की, आपण त्वचेची जास्त प्रमाणात काळजी घेतो. मात्र, फक्त त्वचेचीच काळजी घेऊन या हंगामात चालणार नाही तर आपल्याला त्वचेबरोबरच केसांची देखील काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण या हंगामात केसांच्या विविध समस्या निर्माण होतात.

Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर! 
सुंदर केस
Follow us on

मुंबई : हिवाळ्याचा हंगाम म्हटंले की, आपण त्वचेची जास्त प्रमाणात काळजी घेतो. मात्र, फक्त त्वचेचीच काळजी घेऊन या हंगामात चालणार नाही तर आपल्याला त्वचेबरोबरच केसांची देखील काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण या हंगामात केसांच्या विविध समस्या निर्माण होतात. केस गळती, केस तुटणे, कोंडा आणि कोरड्या केसांची समस्या. या सर्व समस्या टाळण्यासाठी आणि आपले केस निरोगी ठेवण्यासाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत .

हिवाळ्याच्या हंगामात केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर आहे. केस गळती, कोरडे केस आणि केसांमधील कोंडा काढण्यासाठी आपण लसणाच्या 6-7 ताज्या पाकळ्या बारीक करून त्याचा रस काढा. त्यात 2 चमचे एरंडेल तेल घाला. एकत्र मिसळा आणि हे मिश्रण टाळू आणि केसांवर लावा. काही वेळ मसाज करा आणि नंतर 30 मिनिटे राहू द्या. सौम्य शैम्पूने धुवा.

अॅपल सायडर व्हिनेगर देखील केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करते. आपले केस ओले करा आणि अर्धा कप अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी घ्या आणि ते एकत्र करा. ते ओल्या केसांवर आणि टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. दहा मिनिटे सोडा आणि पाण्याने धुवा. डोक्यातील कोंड्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून पुन्हा हे करू शकता.

अॅवकाडो बारीक करून घ्या आणि त्यामध्ये दोन चमके नारळ तेल घाला.  यानंतर, हलक्या हातांनी टाळूवर हे मिश्रण लावा आणि सुमारे 20  मिनिटे मालिश करा. साधारण अर्धा तास ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा. हा उपाय आपण आठ दिवसातून दोनदा केला पाहिजे. ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच हिवाळ्याच्या हंगामात देखील आपले केस निरोगी राहतील.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..