आंबे विकत घेण्याआधी ‘या’ टीप्स नक्की वाचा! आणि घरी आणा पूर्ण पिकलेले परफेक्ट ‘मँगो’

| Updated on: Jun 13, 2021 | 11:59 AM

सध्या आंब्याचा सीजन असल्याने रसदार आणि गोड आंबे खाण्यासारख दुसरं सुख नाही. पण अनेकदा आंबे विकत घेताना आपण गल्लत करतो. त्यामुळे आंबे विकत घेण्याआधी या टीप्स नक्की वाचा.

आंबे विकत घेण्याआधी या टीप्स नक्की वाचा! आणि घरी आणा पूर्ण पिकलेले परफेक्ट मँगो
आंबा
Follow us on

मुंबई : फळांचा राजा असलेला आंबा बहुतेक प्रत्येकाच्याच आवडत्या फळांपैकी एक. रसदार आणि गोड आंबे खायला प्रत्येकालाच आवडंत, पण आंबे विकत घेताना अनेकांची गल्लत होते. त्यामुळे रसदार आणि गोड पूर्णत: पिकलेले आंबे विकत घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.(Before buying Mangoes get know this 4 Tips For Choose Sweet and Perfect Mango)

आंबे विकत घेण्यासाठी उन्हाळ्याचा सीजन सर्वांत चांगला कारण त्याच वेळेस नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे बाजारात येत असतात. याचदरम्यान उन्हाळी सुट्टी असल्याने अनेकांच्या बालपणीच्या आंब्यासोबतच्या काही आठवणी असतातच. गावी गेल्यावर आंब्याच्या झाडावरुन हवे तसे आंबे काढून खाणं अनेकांनी केलेलं असत. पण नंतर कामाच्या व्यस्ततेमुळे बाजारातून आंबे विकत घेण्याशिवाय काही पर्याय नसतो. त्यात पहिल्या पावसानंतर आंब्याचा गोडवा आणखीच वाढतो. बाजारात सर्वत्र आंब्याचा घमघमाट दरवळतो. पण अशावेळी आंबे विकत घेताना या टीप्स नक्की फॉलो करा जेणेकरुन तुम्हाला उत्कृष्ट आंबेच मिळतील.

स्पर्श करुन पाहा

आंबा पिकल्यावर काही प्रमाणात मऊ होतो. त्यामुळे आंबा विकत घेताना त्याला स्पर्श करुन पाहिल्यावर कळते की आंबा पिकला आहे की नाही. जर आंबा मऊ नसून कडक लागत असेल तर तो अजून पिकला नसल्याचे समजावे.

आंब्याचा रंग तपासून पाहा

आंब्याचा रंग शक्यतो फिकट लाल किंवा पिवळा असावा. हे सर्व आंबा कोणत्या प्रकारचा आहे त्यावर अवलंबून असते. आंब्याचा रंग चमकदार हिरवा, फिकट लाल किंवा गडद पिवळा असावा. जोही रंग असेल
तो गडद आणि फ्रेश वाटायला हवा.

आंब्याचा वास घेऊन पाहा

आंब्याच्या वरच्या भागाचा वास घेऊन आंबा फ्रेश आहे का? हे कळते. आंब्याचा वास घेताच एक स्ट्रॉंग, गोड सुंगधित असा फळाचा सुंगध येतो. एका चांगल्या पिकलेल्या आंब्याचा वास कायम गोड आणि सुंगधित येतो.

आंब्याचा आकार

आंब्याचा आकार मोठा आणि गोलाकार असावा. अर्थात विविध प्रकारच्या आंब्यानुसार त्यांचा आकार बदलतो. उदाहरणार्थ तोतापूरी आंबे लांब आणि पातळ असतात तर हापूस आंबे काहीशे बारीक पण फुगीर असतात.

ही वाचा :

Health Tips | गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! कमकुवत होऊ शकते रोग प्रतिकारक शक्ती!

सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!

(Before buying Mangoes get know this 4 Tips For Choose Sweet and Perfect Mango)