सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!

सुंदर त्वचा कोणाला नको असते मात्र, सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची तेवढी काळजी देखील घ्यावी लागते. आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या.

सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी 'हे' फेसपॅक नक्की ट्राय करा!
ताज्या सफरचंदच्या सालीची पावडर, दही, आणि हळद मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण तीस मिनिटे ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे.

मुंबई : सुंदर त्वचा कोणाला नको असते मात्र, सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची तेवढी काळजी देखील घ्यावी लागते. आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली पाहिजे असेल तर चला, त्वचा सुधारण्यासाठीच्या या टिप्स जाणून घेऊया. (This face pack is beneficial for getting beautiful and healthy skin)

तजेलदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आज आम्ही एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. यासाठी दुधावरची साय, गुलाब पाणी, हळद, चंदन पावडर आणि खोबरेल तेल हे साहित्य लागणार आहे. सर्वात प्रथम दुधावरच्या सायमध्ये हळद,गुलाब पाणी, चंदन पावडर आणि खोबरेल तेल मिक्स करा. ही पेस्ट काही वेळ तशीच ठेवा आणि त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. साधारण वीस मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावू शकतो.

अंड्यातील फक्त पिवळा बलकमध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा. त्यात असलेले मध त्वचेला मॉइश्चराइझ ठेवते. हा पॅक वापरल्यानंतर तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होते. अंडी फेसपॅक वृद्धत्वाचा प्रभाव लपविण्यासाठी देखील कार्य करते. कारण त्यामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. हा पॅक तयार करण्यासाठी 1 अंडे घ्या आणि त्यामध्ये 4 ते 5 थेंब तेल मिक्स करा. हे चांगले मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्याला यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा. एक चमचा संत्राच्या रसात अंडे घाला आणि चांगले मिसळा.

जेंव्हा या मिश्रणाला फेस येतो तेव्हा त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळाने हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा. कोरडे झाल्यानंतर ते स्क्रब करून काढा. असे काही दिवस केल्याने मुरुमांच्या समस्या दूर होण्यास मदत मिळेल. कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगड आणि काकडीचा रस लागणार आहे. ते दोन्ही रस व्यवस्थितपणे एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा. दूध आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करण्यासाठी कच्च्या दुधामध्ये 2 चमचे किसलेले कलिंगड मिक्स करा. 25 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(This face pack is beneficial for getting beautiful and healthy skin)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI