AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Israel Iran War : प्रचंड नुकसान होऊनही बाजी अजून पण इराणच्याच हातात, कसं ते समजून घ्या, अमेरिका-इस्रायलला आज ना उद्या..

US Israel Iran War : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध सुरु आहे. या युद्धाला आठवडा होऊन गेलाय. फायटर जेट्स आणि मिसाईल हल्ल्यात इराणमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. राजधानी तेहरानसह अनेक शहरं उद्धवस्त झालीयत. पण बाजी अजूनही इराणच्याच हातात आहे, कसं ते समजून घ्या.

US Israel Iran War : प्रचंड नुकसान होऊनही बाजी अजून पण इराणच्याच हातात, कसं ते समजून घ्या,  अमेरिका-इस्रायलला आज ना उद्या..
US Israel-Iran War
| Updated on: Mar 08, 2026 | 2:41 PM
Share

अमेरिका-इस्रायलने इराण विरोधात युद्ध सुरु केलं, त्याची दोन मुख्यं कारणं होती. एक म्हणजे इराणचा अणवस्त्र कार्यक्रम आणि दुसरं त्यांचा बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅम. त्यांच्या या दोन्ही महत्वकांक्षांपासून अमेरिका-इस्रायल दोघांना धोका होता. त्यामुळे हे भय कायमचचं संपवण्यासाठी इस्रायल-अमेरिकेने इराण विरोधात युद्ध पुकारलं. या युद्धाला आता आठवडा उलटून गेलाय. इस्रायल-अमेरिकेने इराणमध्ये भयानक हल्ले केलेत. इराणने सुद्धा आखाती देश, इस्रायल आणि मिडिल ईस्टमधील अमेरिकन तळांवर प्रचंड मोठे मिसाइल हल्ले केले आहेत. या युद्धात इराणचं जास्त नुकसान झालय हे वास्तव आहे. इराणच्या आकाशावर पूर्णपणे इस्रायल-अमेरिकेचं नियंत्रण आहे. राजधानी तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये मोठी पडझड झाली आहे.

आता अमेरिका आणि इस्रायल एका स्पेशल ऑपरेशनच्या विचारात आहेत. इराणने भले अणूबॉम्ब बनवला नसेल पण त्यांच्याकडे अजूनही उच्च संवर्धित यूरेनियम आहे. हे युरेनियम ताब्यात घेण्यासाठी एका खास सैन्य पर्यायावर चर्चा सुरु झालीय. भविष्यात दोन्ही देश इराणमध्ये स्पेशल फोर्सेस पाठवण्याचा विचार करु शकतात. इराण जवळ असलेलं 450 किलोग्रॅम 60% संवर्धित यूरेनियम आपल्या ताब्यात घेणं हा या मिशनचा उद्देश असेल.

म्हणूनच अमेरिका-इस्रायलला हा साठा धोकादायक वाटतो

काहीही झालं तरी इराणला अणवस्त्र बनवू देणार नाही हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलय. एक्सपर्टच म्हणणं आहे की, 60 टक्के संवर्धित युरेनियम फार कमी काळात 90 टक्क्यापर्यंत पोहोचवता येऊ शकतं. अणवस्त्र बनवण्यासाठी इतके टक्के युरेनियम हवं. म्हणूनच अमेरिका-इस्रायलला हा साठा धोकादायक वाटत आहे.

कोण करणारं ऑपरेशन?

हे मिशन सुरु झाल्यास अमेरिका आणि इस्रायली सैनिकांना थेट इराणच्या भूमीत पाय ठेवावा लागेल असं अमेरिकी मिडिया संस्था Axios ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. त्यांना प्रचंड सुरक्षा व्यवस्था असलेल्या भूमिगत अणवस्त्र ठिकाणांपर्यंत पोहोचून तिथलं युरेनियम ताब्यात घ्यावं लागेल. हे ऑपरेशन फक्त अमेरिका करणार की इस्रायल की दोघे मिळून करणार हे अजून ठरलेलं नाही.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?

या मिशनमध्ये सहभागी होणाऱ्या सैनिकांना इराणी सैन्याकडून कुठलाही धोका नसेल याची खात्री पटल्यानंतरच हे पाऊल उचललं जाऊ शकतं. जमिनीवरील स्थिती अमेरिका-इस्रायलच्या नियंत्रणात असतानाच हे पाऊल उचललं जाईल. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अलीकडेच काँग्रेसला काही गोष्टींची कल्पना दिली. त्यावेळी ते म्हणाले की, इराणमधील संवर्धित युरेनियमच्या प्रश्नावर म्हणाले की, कोणाला तरी तिथे जाऊन ते मिळवावचं लागेल.

Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य