AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

United Nations Army Rules: दोन देशातील युद्धात संयुक्त राष्ट्र पाठवू शकते सैन्य? UN चार्टरचा नियम काय?

United Nations Army Rules: मध्य-पूर्वेत तणाव वाढला आहे. इराण-इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धाचे चटके संपूर्ण देशाला बसत आहे. अशावेळी संयुक्त राष्ट्र संघ (UN) युद्ध थांबवण्यासाठी लष्कर पाठवू शकते? काय सांगतो नियम?

United Nations Army Rules: दोन देशातील युद्धात संयुक्त राष्ट्र पाठवू शकते सैन्य? UN चार्टरचा नियम काय?
संयुक्त राष्ट्र संघटना Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 08, 2026 | 2:15 PM
Share

United Nations Army Rules: अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणवर हल्ला चढवला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ला केला होता. मध्य-पूर्व आशियात आठवडाभरापासून एअरस्ट्राईक आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. या वृत्तानुसार, इस्त्रायलने इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब वर्षाव केला. तर इराणने पश्चिम आशिया आणि अमेरिका-इस्त्रायलच्या लष्कराच्या तळावर हल्ला चढवला. अशावेळी संयुक्त राष्ट्र संघ (UN) युद्ध थांबवण्यासाठी लष्कर पाठवू शकते? काय सांगतो नियम?

संयुक्त राष्ट्र संघ यु्द्ध थांबवू शकते?

संयुक्त राष्ट्र संघ युद्धात सैन्य पाठवू शकतो आणि युद्ध थांबवण्यासाठी लष्कराला पाचारण करू शकतो. पण याची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ आहे. युनायटेड नेशन्सच्या चार्टरनुसार, ही प्रक्रिया विहित नियमांना धरुन करावी लागते. संयुक्त राष्ट्र संघाकडे स्वतःचे कायमस्वरूपी सैन्य नाही. संयुक्त राष्ट्रसंघाची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतंर्गत जे नियम आहेत त्यातंर्गत हे लष्कर तैनात करता येते.

कायमस्वरूपी सैन्य नाही

विविध संघटना असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाकडे स्वतःचे कायमस्वरुपी सैन्य नाही. संयुक्त राष्ट्र संघ लष्करासाठी सदस्य देशांवर अवलंबून आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडे शांती सेना असते. तसेच एखाद्या ठिकाणी सैन्य कारवाई करायची असेल तर सदस्य देशातील भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, युरोपातील काही देश जवान, युद्ध साहित्य आणि इतर आवश्यक शस्त्रांचा पुरवठा करतात. विविध देशातील है लष्कर संयुक्त राष्ट्र संघाच्या झेंड्याखाली एकत्र लढतात. अर्थात अशी मोहिम ही एखाद्या प्रदेशातील बंडाळी आणि हुकूमशाहांविरोधात केली जाते.

सुरक्षा परिषदेची मंजुरी

कोणत्याही लढाईत संयुक्त राष्ट्राच्या सैनिकांना पाठवण्यासाठी अगोदर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची मंजुरी घ्यावी लागते. सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य देश आहेत. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंडचा समावेश आहे. लष्कर तैनातीसाठी कमीत कमी 9 सदस्य देशांनी मंजुरी देणे गरजेचे आहे. तर पाच कायम सदस्य देशांनी जर नकाराधिकाराचा वापर केला तर मग संयुक्त राष्ट्र त्याचे लष्कर संबंधित ठिकाणी पाठवू शकत नाही.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...