AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan: इराण युद्धात पाकिस्तानची उडी? मध्य-पूर्वेतील तणावात दिवाळखोर शेजार्‍याची जंगची तयारी

Pakistan in Middle East War: मध्य-पूर्वेत तणाव शिगेला पोहचला आहे. युद्धाचा भडका उडालेला असताना आता दिवाळखोर पाकिस्तान ही युद्धात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणविरोधात पाकिस्तान लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही वार्ता समोर येताच जनतेने डोक्याला हात लावला आहे.

Pakistan: इराण युद्धात पाकिस्तानची उडी? मध्य-पूर्वेतील तणावात दिवाळखोर शेजार्‍याची जंगची तयारी
पाकिस्तान, इराण युद्ध, डोनाल्ड ट्रम्प, असीम मुनीरImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Mar 08, 2026 | 1:17 PM
Share

Pakistan in Middle East War: मध्य-पूर्व आशियात इराकविरोधातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. युद्धाचा भडका उडाला आहे. इराण अजून सहा महिने युद्ध लढण्याचा इशारा रिव्होल्युशनरी गार्डने दिला आहे. तर अणवस्त्र ताब्यात घेण्यासाठी इराणमध्ये सशस्त्र दलाच्या तुकड्या पाठवू अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या घडामोडी घडत असताना या जंगमध्ये पाकिस्तानही उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेजारी देशातील जनतेत एकच खळबळ उडाली आहे. दिवाळखोरीत गेलेल्या पाकिस्तानी जनतेला महागाईचे चटके बसत असताना युद्धात उतरण्याची भाषा पाकला का करावी लागत आहे?

असीम मुनीरने दिले आश्वासन

पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी सौदी अरबचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांना आश्वासन दिले आहे की इराणने आता सौदीवर पुन्हा हल्ला चढवला तर पाकिस्तान इराणवर हल्ला चढवेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरब आणि पाकिस्तान यांच्यात संरक्षण करार झालेला आहे. त्यानुसार पाकिस्तानी लष्कराची एक मोठी तुकडी अगोदरच सौदी अरबमध्ये तैनात आहेत. या लष्करी तुकडीला युद्धासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. इराणने आखाती देशातील विविध ठिकाणच्या अमेरिकन लष्करी तळावर हल्ले चढवले. त्याचवेळी या भागातील विविध शहरातील प्रमुख ठिकाणांनाही लक्ष्य केले. त्यामुळे मुस्लिम जगत इराणवर नाराज आहे. आखाती देशांमध्ये याविषयीची एक बैठकही पार पडली. तर दुसरीकडे इराणच्या राष्ट्रपतींनी झालेल्या हल्ल्याविषयी अरब राष्ट्राची माफी मागितली आहे. पण युद्ध थांबलेले नाही. इराण समर्थित हिजबुल्लाह, हमास आणि हुती या दहशतवादी संघटना पुन्हा सौदी अरबमध्ये हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वायुदलाची इराणवर कारवाई

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी वायुदलाने यापूर्वीच इराणच्या संभावित ठिकाणांना लक्ष्य केले आहे. सौदीवर हल्ले होताच इराणवर पाकच्या वायुदलाने हल्ले केले. तर काही हल्ले परतावून लावण्यासाठी कारवाई केली. विशेष म्हणजे जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानने इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान भागात हल्ले चढवले होते.

पाकची अवस्था बिकट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 ते 8 मार्च 2026 दरम्यान पाकिस्तानी लष्कर आणि विविध संरक्षण विभागातील जवळपास 3,80,390 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा भयावह आहे. बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि अफगान तालिबान हल्ल्यात अनेक जवानांसह नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात नागरिकांच्या मृत्यूचा आकडा 250 हून अधिक झाला आहे. पाकिस्तानमध्ये ऊर्जा संकट अधिक गडद झाले आहे. पाककडे केवळ 20 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा आहे. पेट्रोल-डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर पेट्रोल पंपावरील हिंसेत गेल्या दोन दिवसात काही लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड