AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री 2.45 वाजता दादा कोंडकेंना अटॅक आला, मृतदेह गाडीत मांडीवर ठेवून… दादा गेले त्या रात्री नेमकं काय घडलं?

महाराष्ट्राला हसवणारे दादा कोंडके कसे गेले? लेखिका अनिता पाध्ये यांनी त्यांच्या निधनाचा हृदयद्रावक प्रसंग सांगितला आहे. रात्री २:४५ वाजता हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही. अखेर त्यांच्याच गाडीत, मांडीवर ठेवून त्यांचा मृतदेह नेण्यात आला. ही घटना महाराष्ट्रासाठी चटका लावणारी ठरली, जी आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

रात्री 2.45 वाजता दादा कोंडकेंना अटॅक आला, मृतदेह गाडीत मांडीवर ठेवून... दादा गेले त्या रात्री नेमकं काय घडलं?
Dada KondkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2026 | 12:13 AM
Share

अभिनेते दादा कोंडके यांनी आयुष्यभर महाराष्ट्राला हसवलं. प्रत्येकाला क्षणभर दु:ख विसरून उभं राहायला शिकवलं. त्यामुळेच दादांचा चाहता वर्ग केवळ मराठी आणि महाराष्ट्रातच नव्हता तर देशभर होता. अनेक बॉलिवूडचे कलाकारही दादांचे फॅन होते. संपूर्ण देशाला खळखळून हसायला लावणाऱ्या दादांना मात्र शेवटच्या काळात रुग्णवाहिकाही मिळाली नव्हती. त्यामुळे दादांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह मांडीवर ठेवून नेण्याची वेळ आली होती. प्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार अनिता पाध्ये यांनी हा किस्सा सांगितला आहे.

प्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार अनिता पाध्ये यांनी लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली होती. ही मुलाखत सध्या सोशल मीडियाला व्हायरल होत आहे. त्यात दादा कोंडके यांच्या निधनाचा प्रसंग त्यांनी सांगितला आहे. दादांचे मॅनेजर जितूभाई यांचा मला रात्री 2.45 वाजता फोन आला. दादांची तब्येत बिघडल्याचं त्याने सांगितलं. आम्ही दादांना रुग्णालयात नेत आहोत. तुम्ही याल का? असं त्यांनी विचारलं. मी येते म्हणून सांगितलं. त्यावेळी दादा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या चौघांसोबत राहायचे. त्या रात्री मी माझ्या भावाला उठवलं आणि तडक हॉस्पिटल गाठलं, असं अनिता पाध्ये म्हणाल्या.

10 मिनिटा आधीच दादा…

रुग्णालयात गेल्यावर दादांना कॉरिडोअरमध्ये ठेवल्याचं पाहिलं. मी डॉक्टरांना काय झालं म्हणून विचारलं. त्यावर त्यांनी दादांना हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं. मी त्यांना दादांना पम्पिंग करून पाहायला सांगितलं. त्यावर काही होईल असं वाटत नाही. दादा जाऊन 10 मिनिटे झाल्याचं डॉक्टर म्हणाले. मी त्यांना तरीही प्रयत्न करायला सांगितले. डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण काही झालं नाही. दादा जग सोडून गेले होते. असं अनिता पाध्ये म्हणाल्या.

बहिणीला फोन लावला

त्यानंतर मी माझ्या भावाला दादांच्या घरी जायला सांगितलं. तिथून दादांच्या नातेवाईकांना फोन करायला सांगितलं. दादांची बहीण कोल्हापूरला राहायचा. त्यांचा असिस्टंटही कोल्हापुरात होता. त्यांना फोन करायला भावाला सांगितलं. त्यावेळी एसटीडी करावी लागायची. दादांच्या पुण्यातील नातेवाईकांनाही फोन करून बोलवायला सांगितलं, असं त्या म्हणाल्या.

दोन तास प्रेताजवळ एकटी

आम्हाला दादांचा मृतदेह घेऊन जायचा होता. रुग्णालयाच्या दारात रुग्णवाहिका होती. पण फॉर्म भरावा लागेल. रजिस्टर लॉकरमध्ये आहे आणि लॉकर बंद आहे, असं आम्हाला सांगून रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यावेळी जास्त रुग्णवाहिका नव्हत्या. त्यानंतर मी पहिला फोन विजय कोंडकेंना केला. त्यांना सर्व माहिती दिली. कारण काही केलं तरी आम्ही बाहेरची माणसं. रक्ताचे नातेवाईक विजय कोंडके होते. विजय कोंडके आणि दादांचे शेवटच्या काळात संबंध चांगले नव्हते. पण मी त्यांना फोन केला. म्हटलं विजय भाई असं झालंय. तुम्ही ठरवा येणार की नाही येणार. त्यानंतर दादांचे दोन मित्र होते त्यांना फोन करून सांगितलं. त्यावेळी शिवसेनेचे कामगार मंत्री होते साबिर शेख होते. त्यांनाही सांगितलं. ते अंबरनाथला होते. दोन तास मी दादांच्या प्रेताजवळ एकटी होते. आम्हाला रुग्णवाहिका मिळाली नाही. दादाची कॉन्टेसा गाडी होती. त्या गाडीचा पाठचा भाग रुंद असतो. दादांचे दोन मित्र आणि आम्ही त्या गाडीत बसलो. आम्ही दादांचं प्रेत मांडीवर घेऊन घरी आलो. कारण रुग्णवाहिकाच नव्हती, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं