Moon Transit: चंद्र गोचरमुळे 7 राशींचं भाग्य फळफळणार! अचानक धन लाभासह मिळणार नव्या संधी
Chandra Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र गोचरचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. मात्र, यावेळी चंद्र गोचरमुळे ७ राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा, करिअरमध्ये प्रगती आणि सुख-समृद्धीचे योग जुळून येतील. जाणून घ्या कोणत्या आहेत या भाग्यवान राशी.

वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन, भावना आणि मानसिक शांततेचा कारक ग्रह मानलं जातं. गुरुवार 29 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 10 वाजून 6 मिनिटांनी चंद्र वृषभ राशीतून बाहेर पडून बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र 1 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत मिथुन राशीत राहणार आहे. चंद्राच्या गोचराचा प्रभाव सर्व 12 राशींवर होत असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. या चंद्र गोचरमुळे 7 राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. विचार करण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वाढण्यासोबतच आर्थिक प्रगतीचे योग जुळून येतील. जाणून घेऊया कोणत्या आहेत या 7 भाग्यवान राशी.
मेष रास
आत्मविश्वास वाढेल. कामं अधिक उत्साहाने आणि धाडसाने पूर्ण कराल. मेहनतीचं चांगलं फळ मिळू शकतं. रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.
मिथुन रास
मन प्रसन्न राहील. अनेक कामं संवादाच्या माध्यमातून मार्गी लागू शकतात. आवश्यक गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगली संधी मिळू शकते.
सिंह रास
आर्थिक लाभ होईल. पैशांशी संबंधित एखादा फायदा झाल्यामुळे महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात. प्रवासाचे योग जुळून येतील. हा प्रवास भविष्यात फायदेशीर ठरू शकतो.
कन्या रास
नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील. सरकारी कामांमधून फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. नवीन योजना अपेक्षेप्रमाणे पुढे जाऊ शकतात.
तूळ रास
बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामं हळूहळू मार्गी लागू शकतात. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घेणं आवश्यक आहे.
धनु रास
वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हे गोचर शुभ ठरू शकतं. जोडीदारासोबत असलेले गैरसमज दूर होतील. एकमेकांशी शांतपणे संवाद साधल्यामुळे नात्यातील दुरावा कमी होईल. परस्पर समजूतदारपणा वाढून नातं अधिक मजबूत होईल.
मीन रास
आर्थिक लाभ होईल. जमीन किंवा वाहन खरेदीशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मन प्रसन्न आणि शांत राहिल. वैयक्तिक आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल घडू शकतात.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
