वजन कमी करण्यापासून डोळ्यांसाठी गुणकारी धणे पाणी, जाणून घ्या याचे अनेक फायदे

| Updated on: May 09, 2021 | 7:30 AM

धण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम आढळतात आणि हे सर्व घटक रोगांपासून दूर ठेवतात. (Benefits of coriander water for weight loss to eye issues, know more about it)

वजन कमी करण्यापासून डोळ्यांसाठी गुणकारी धणे पाणी, जाणून घ्या याचे अनेक फायदे
वजन कमी करण्यापासून डोळ्यांसाठी गुणकारी धणे पाणी
Follow us on

नवी दिल्ली : प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले धणे केवळ अन्नालाच चवदार बनवत नाही तर याचे अनेक फायदे आहेत. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक लाभ मिळतात. धणे शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे अ, सी जीवनसत्वासह पुष्कळ पोषक तत्वांचा पुरवठा करते. हेच कारण आहे की आरोग्य तज्ज्ञ हे हर्बल टी, डेकोक्शन इत्यादी स्वरूपात वापरण्याचा सल्ला देतात. धण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम आढळतात आणि हे सर्व घटक रोगांपासून दूर ठेवतात. अलिकडेच आयुष मंत्रालयानेही कोविड -19 गाईडलाईनमध्ये आरोग्य लाभ म्हणून त्यास खाद्यपदार्थामध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश जारी केले आहेत. (Benefits of coriander water for weight loss to eye issues, know more about it)

असे तयार करा धणे पाणी

– एका पात्रात एक ग्लास पाणी घ्या आणि गॅसवर उकळा.
– हे पाणी उकळण्यास सुरवात झाल्यावर त्यात एक चमचा धणे घाला.
– अर्धे पाणी कमी होईपर्यंत उकळी येऊ द्या.
– हे पाणी गाळून चहासारखे गरम गरम प्या.

धणे पाण्याचे फायदे

– धण्याचे पाणी पचनक्रियेच्या समस्या दूर करते.
– पोटात गॅस, जळजळ होण्याची समस्या दूर करते.
– हे शरीरात चयापचय प्रक्रियेस गती देते.
– हे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
– थायरॉईड हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे.
– याच्या वापरामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी केली जाऊ शकते.
– यामुळे सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत होते.
– हे शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही.
– हे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते.
– याच्या मदतीने आपण मूत्रपिंड डिटॉक्स करू शकता.
– उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवते आणि उष्णता दूर करण्यासाठी देखील कार्य करते.
– चेहऱ्यावर सूज सारख्या तक्रारींचा त्रासही दूर होतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

धणे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहेत. धणे पाण्यात उकळवा. हे पाणी थंड झाल्यावर जाड कपड्याने चाळणी करुन याचे दोन थेंब डोळ्यात घातल्याने जळजळ, वेदना, डोळ्यातून पाणी येण्यासारख्या समस्या दूर होतात. (Benefits of coriander water for weight loss to eye issues, know more about it)

इतर बातम्या

Team India | संघात स्थान हवंय? आधी वजन कमी कर, बीसीसीआयचा ‘या’ स्टार खेळाडूला सल्ला

घर बसल्या पैसे काढण्याबरोबरच जमा करण्याची ‘या’ बँकांकडून सुविधा, जाणून घ्या कसा मिळवाल लाभ