अवघ्या 10 रुपयांत मिळणाऱ्या या पदार्थांचा रुटीनमध्ये करा समावेश, उष्माघाताचा होणार नाही त्रास

| Updated on: Apr 18, 2023 | 2:52 PM

Summer Health Care Tips : यावेळी उन्हाळ्याचा तडाखा जास्तच वाढला आहे , ज्याचा सर्वांनाच त्रास होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तील एसी लावून गारेगार होणं शक्य नाही. अशा वेळी काही स्वस्त गोष्टींच्या मदतीने उन्हाळा सहनीय होऊ शकेल.

अवघ्या 10 रुपयांत मिळणाऱ्या या पदार्थांचा रुटीनमध्ये करा समावेश, उष्माघाताचा होणार नाही त्रास
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात उन्हाचा (hot summer) तडाखा बसणे नेहमीचेच असते, मात्र आताचा उन्हाळा अतिशय कडाक्याचा आहे. कडक ऊन किंवा उष्णतेपासून आराम मिळणे कठीण आहे. यामुळे बहुतांश लोकांना उन्हाळ्यापेक्षा हिवाळा जास्त आवडतो. उन्हाळ्यात डिहायड्रेशन (dehydration) किंवा सनस्ट्रोकमुळे खूप त्रास होतो. हे शक्य तितके घरात राहून टाळता येते, परंतु ते सगळ्यांनाच शक्य नाही. मात्र काही पदार्थ (food) खाऊन, त्या अन्नाद्वारेही शरीराला हायड्रेटेड ठेवता येते.

आता प्रश्न असा येतो, की सगळेजण काही सतत एसी चालू ठेवून बसू शकत नाही कारण त्यामुळे खिशावरचा भार वाढेल. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने उन्हाळा सहनीय होऊ शकेल.

दही किंवा ताक

दही किंवा त्यापासून बनणारे ताक, हा पदार्थ उन्हाळ्यात सर्वांना खूप आवडतो. दुपारच्या जेवणासोबत एक ग्लास ताक पिणे यामुळे गार वाटतं. ताक हे पोटात निर्माण होणारी उष्णता आणि आम्लपित्त आपल्यापासून दूर ठेवते आणि त्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपण ते कमी किमतीत बाजारातून विकत घेऊ शकता. किंवा घरीही बनवू शकतो. तसेच दह्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

सत्तू

बाजारात अवघ्या काही रुपयांत मिळणाऱ्या सत्तूपासून उत्तम उन्हाळी पेय बनवता येते. हरभऱ्यापासून बनवलेले सत्तू पोटात उष्णता जमा होऊ देत नाही आणि त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते उष्माघातापासून आपले संरक्षण करते. एका ग्लास पाण्यात दोन चमचे सत्तू टाकून सकाळी लवकर प्या. तुम्ही दिवसभर उष्णतेपासून वाचाल आणि उत्साही देखील वाटेल.

काकडी ठरेल फायदेशीर

उन्हाळ्यात पाणी जास्त असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाचा विचार केला तर काकडींकडे दुर्लक्ष कसे करता येईल. सुमारे 90 टक्के पाण्याने भरलेली काकडी उन्हाळ्यातील सर्वोत्तम अन्न मानली जाते आणि ती स्वस्त वस्तू देखील आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते काकडीचे एखादे ड्रिंक बनवून किंवा जेवणात सॅलॅड म्हणूनही ती खाऊ शकता. उन्हाळ्यात रोज एक काकडी खावी.

लिंबाचा रस

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासोबतच व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करण्यासाठी लिंबाचा रस उत्तम आहे. बाजारात तुम्हाला किमान 3 लिंबू 10 रुपयांना मिळतील. अर्ध्या लिंबांचे सरबत किंवा इतर पेय दिवसातून एकदा प्या आणि उन्हाळ्यात हायड्रेटेड राहा.