Coronavirus Symptoms: कोरोनाचा आता डोळ्यांवर हल्ला, संशोधनात समोर आलं धक्कादायक लक्षण

| Updated on: Dec 12, 2020 | 11:34 AM

एका नवीन अभ्यासानुसार, डोळ्यातील वेदना कोरोना व्हायरसचं एक प्रमुख लक्षण (Coronavirus Symptoms) असल्याचं समोर आलं आहे.

1 / 9
डोळ्यांतून पाणी येणं किंवा वेदना होणं ही एक सर्वसाधारण समस्या झाली आहे. टीव्ही, मोबाइल किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांमध्ये अशा समस्या उद्धभवतात. पण एका नवीन अभ्यासानुसार, डोळ्यातील वेदना कोरोना व्हायरसचं एक प्रमुख लक्षण (Coronavirus Symptoms) असल्याचं समोर आलं आहे.

2 / 9
यूकेच्या भारतीय वंशाच्या प्राध्यापक शाहीना प्रधान यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.

3 / 9
शाहीना प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू संपूर्ण शरीरात फिरत आहे. ब्रिटनमधील अँगलिया रस्किन विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर एक विशेष सर्वेक्षण केलं आणि त्यांच्या लक्षणांबद्दल माहिती घेतली.

4 / 9
पहिल्यांदाच असा अभ्यास करण्यात आला असून ज्यामध्ये डोळ्यांशी संबंधित सर्व लक्षणांचा कोरोना विषाणूशी संबंध जोडण्यात आला आहे. इतकंच नाहीतर कोरोनाच्या इतर लक्षणांच्या तुलनेत डोळ्यांशी संबंधित ही लक्षणे शरीरात किती काळ टिकून राहतात हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

5 / 9
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अभ्यास BMJ Open Ophthalmology या रोगशास्त्र जर्नलमध्ये छापण्यात आला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना झाल्यानंतर डोळ्यांच्या समस्या सुरू झाल्याचं अनेक रुग्णांकडून सांगण्यात आलं आहे.

6 / 9
यापैकी 16 टक्के रुग्णांना डोळ्याच्या दुखण्याची लक्षणं आढळली तर फक्त 5 टक्के लोकांनी आधीच डोळ्यांचा त्रास होता अशी माहिती दिली.

7 / 9
अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या 18 टक्के लोकांनी फोटोफोबिया किंवा प्रकाशात त्रास होत असल्याचं सांगितलं आहे.

8 / 9
इतकंच नाही तर आधीपासूनच त्रास होता पण आता कोरोना झाल्यामुळे यामध्ये वाढ झाल्याचंही काही रुग्णांकडून सांगण्यात आलं आहे.

9 / 9
एकूणच, अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, 83 टक्के लोकांपैकी 81 टक्के लोकांमध्ये कोरोना झाल्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यांवर झाल्याचं समोर आलं.