Weight loss | वजन कमी करुन स्लिम दिसायचंय मग अभिनेत्री कीर्ती कुल्हारीच्या या स्पेशल टिप्स फॉलो करा!

| Updated on: Jun 18, 2022 | 12:43 PM

बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टव्दारे तिने आपल्या चाहत्यांना फिटनेससंदर्भात काही खास टिप्स दिल्या आहेत. इतकेच नाहीतर तर कीर्तीने नाश्ता करण्याचे महत्व देखील पटवून दिले. तिने देशी नाश्त्याचे महत्व सांगितले आहे. तिने एक प्लेट शेअर केलीये.

Weight loss | वजन कमी करुन स्लिम दिसायचंय मग अभिनेत्री कीर्ती कुल्हारीच्या या स्पेशल टिप्स फॉलो करा!
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आपण आहारामध्ये काय घेतो, यावर आपले आरोग्य, केस आणि त्वचा यांचे भविष्य ठरलेले असते. बरेच लोक वजन कमी (Weight loss) करण्यासाठी अत्यंत कमी अन्नाचे सेवन करतात. जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. वजन कमी करण्याच्या नादामध्ये बऱ्याच वेळा सकाळचा नाश्ता वगळला जातो. मात्र, अशी चुक कधीच करू नका. आपल्या शरीरासाठी सकाळचा नाश्ता (Breakfast) हा अत्यंत महत्वाचा असतो. या नाश्त्यामधून आपल्याला दिवभराची ऊर्जा मिळवण्यास मदत होते. असे म्हटले जाते की तुम्ही जितका चांगला नाश्ता कराल तितकी दिवसभर उर्जा शरीरात टिकून राहते. जर तुम्हाला उशीरा नाश्ता करण्याची सवय लागली असेल तर त्याचे अनेक तोटे आहेत. नाश्ता करणे नेहमीच टाळले तर तुम्हाला मधुमेह (Diabetes) होण्याची देखील दाट शक्यता आहे.

अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने शेअर केली पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टव्दारे तिने आपल्या चाहत्यांना फिटनेससंदर्भात काही खास टिप्स दिल्या आहेत. इतकेच नाहीतर तर कीर्तीने नाश्ता करण्याचे महत्व देखील पटवून दिले. तिने देशी नाश्त्याचे महत्व सांगितले आहे. तिने एक प्लेट शेअर केलीये, यामध्ये दुधी भोपळ्याची भाजी, भाकरी ते पण मस्त तूप लावलेली, त्यासोबतच दही रायता, कांदा आणि लोणचे देखील दिसते आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही डाळ खिचडी देखील खाऊ शकता. तुम्ही जितके हलके खाल तितके गॅस, अपचन आणि अॅसिडीटीसारख्या समस्या तुमच्यापासून दूर राहतील.

हे सुद्धा वाचा

दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी हा पदार्थ महत्वाचा

खिचडी अनेक प्रकारे बनवता येते. विशेष म्हणजे खिचडीमध्ये तुम्ही अनेक पालेभाज्यांचा देखील समावेश करू शकता. शक्य तितके जास्त प्रमाणात खिचडीमध्ये डाळींचा समावेश करा. यामुळे आपल्या शरीराला अधिक प्रमाणात प्रोटीन मिळण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही खिचडीचा समावेश करावा. यामुळे आपल्या शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही दही आणि भाताचाही समावेश करू शकता. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अर्धी वाटी तांदूळ आणि एक वाटी मूगाची डाळ घ्या आणि त्याची खिचडी करून खा. यामुळे वजनही कमी होईल आणि पोटही भरलेले राहिल.