Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ 3 प्रकारच्या पिठांचा समावेश करा!

| Updated on: Dec 05, 2021 | 9:02 AM

वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आहारामध्ये विविध बदल करत असतो. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी भाकरीचा आहारात समावेश करतात. मात्र, खरोखरच वजन कमी करण्यासाठी भाकरी मदत करते का? आज आपण बघणार आहोत की, वजन कमी करण्यासाठी भाकरी किती फायदेशीर आहे.

Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी आहारात या 3 प्रकारच्या पिठांचा समावेश करा!
वाढलेले वजन
Follow us on

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आहारामध्ये विविध बदल करत असतो. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी भाकरीचा आहारात समावेश करतात. मात्र, खरोखरच वजन कमी करण्यासाठी भाकरी मदत करते का? आज आपण बघणार आहोत की, वजन कमी करण्यासाठी भाकरी किती फायदेशीर आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी कोणत्या पिठाच्या आहारात समावेश केला पाहिजे.

ज्वारीचे पीठ

वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहारात ज्वारीच्या पिठाचा समावेश करा. ज्वारीची भाकरी वजन कमी करण्यास मदत करते. कारण ज्वारीचे पीठ ग्लूटेन फ्री असते. ज्वारीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यांची पचनक्रिया चांगली नाही त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हे पीठ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी देखील खूप मदत करते. यामुळे आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये ज्वारीच्या पीठाचा समावेश करा.

बाजरीचे पीठ

बाजरीमध्ये फायबर आणि पोटॅशियम भरपूर असतात. जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. बाजरी पचनास जड असल्यामुळे खाल्ल्यानंतर बराच काळ भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते. बाजरीच्या भाकरीसोबत तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे तुम्ही बाजरीच्या पिठाची खिचडी देखील तयार करू खाऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल.

नाचणीचे पीठ

नाचणीचे पीठ देखील ग्लुटेन फ्री असते. त्यात फायबर आणि अमीनो ऍसिड मोठ्या प्रमाणात असते. त्याची भाकरी खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, भूक कमी होते आणि वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. आपण आपल्या दररोजच्या नाश्त्यामध्ये नाचणीच्या पिठाचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

Skin care : ऑफिस शिफ्टमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरा या टिप्स, चेहरा दिसेल तजेलदार