Jaggery Benefits : वजन कमी करण्यापासून शरीराला डिटॉक्स करण्यापर्यंत गूळ अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Sep 18, 2021 | 10:33 AM

गूळ हा लोहाचा चांगला स्त्रोत आहे. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही नियमितपणे गूळ खावा. हे हिमोग्लोबिन खूप वेगाने वाढवते आणि अशक्तपणा सारख्या समस्या टाळते. साखरेच्या तुलनेत गुळामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी आपल्या आहारामध्ये गुळाचा समावेश करावा.

Jaggery Benefits : वजन कमी करण्यापासून शरीराला डिटॉक्स करण्यापर्यंत गूळ अत्यंत फायदेशीर!
गूळ
Follow us on

मुंबई : अनेक लोकांना गोड पदार्थ खाण्यास आवडतात. मात्र, वाढलेले वजन, मधुमेह यामुळे गोड पदार्थ खाता येत नाहीत. पूर्वीच्या काळी देखील लोक गोड पदार्थ खात असत. पण त्यांना लठ्ठपणा किंवा मधुमेहाच्या समस्या नसायच्या. मात्र, आपण गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ मिक्स केला तर आपल्याला आरोग्याची कोणतेही समस्या निर्माण होणार नाही आणि आपले वजनही वाढणार नाही. (Jaggery beneficial for weight loss)

गुळाचे फायदे जाणून घ्या

1- अशक्तपणा दूर होतो

गूळ हा लोहाचा चांगला स्त्रोत आहे. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही नियमितपणे गूळ खावा. हे हिमोग्लोबिन खूप वेगाने वाढवते आणि अशक्तपणा सारख्या समस्या टाळते.

2- वजन कमी करण्यासाठी

साखरेच्या तुलनेत गुळामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी आपल्या आहारामध्ये गुळाचा समावेश करावा.

3- पाचक प्रणाली सुधारते

गूळ खाल्ल्यास अन्न सहज पचते. गूळ व्हिटॅमिन आणि मिनरल इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करतो. फायबर, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने, ते खाल्याने तुमची पाचन प्रणाली सुधारते आणि उलट्या, गॅस, अपचन यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.

4- शरीर डिटॉक्स होते

गूळ खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. हे रक्त शुद्ध करते आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकते. सर्दी आणि शारीरिक अशक्तपणा सारख्या समस्या देखील त्याच्या सेवनाने दूर होतात.

5- हाडे मजबूत होतात

गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. दोन्ही पोषक घटक हाडांसाठी चांगले मानले जातात. जर आले रोज गुळाबरोबर सेवन केले तर सांधेदुखीमध्ये बराच आराम मिळतो.

6- दम्याच्या त्रासात फायदेशीर 

गूळ हा दमा आणि ब्राँकायटिसपासून बचाव करण्यासाठी मदत करते. ज्या लोकांना श्वसनासंबंधी काही त्रास असेल त्यांनी आवर्जुन गूळ खायला हवं. तिळ-गुळाचे लाडू खाणंही फायदेशीर ठरेल.

7- रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यात मदत करते

रक्तदाब नियंत्रित करण्यात गुळाची भूमिका महत्त्वाची ठरते. विशेषत: उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

8- रोगप्रतीकारक शक्ती वाढवते

गुळात सेलेनिअम आणि झिंक यांसारखे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. हे शरिराला फ्री रेडिकल्स आणि संसर्गापासून बाचाव करतात. त्यामुळे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात गुळाचं सेवन केलं जातं.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Jaggery beneficial for weight loss)