Besan Milk Cake : दिवाळीमध्ये घरी बनवा खास बेसन मिल्क केक, जाणून घ्या रेसिपी!

| Updated on: Nov 04, 2021 | 10:58 AM

दिवाळीमध्ये गोड पदार्थांना मोठे महत्व आहे. जर तुम्हाला घरी मिठाई बनवायला आवडत असेल तर तुम्ही बेसन मिल्क केक देखील बनवू शकता. बेसनाचा मिल्क केक बनवण्यासाठी तुम्हाला बेसन, तूप, दूध पावडर आणि साखर लागेल. क्रिमी मिल्क केक ही एक अनोखी रेसिपी आहे.

Besan Milk Cake : दिवाळीमध्ये घरी बनवा खास बेसन मिल्क केक, जाणून घ्या रेसिपी!
बेसन मिल्क केक
Follow us on

मुंबई : दिवाळीमध्ये गोड पदार्थांना मोठे महत्व आहे. जर तुम्हाला घरी मिठाई बनवायला आवडत असेल तर तुम्ही बेसन मिल्क केक देखील बनवू शकता. बेसनाचा मिल्क केक बनवण्यासाठी तुम्हाला बेसन, तूप, दूध पावडर आणि साखर लागेल. क्रिमी मिल्क केक ही एक अनोखी रेसिपी आहे. हे बनवण्यासाठी तुम्हाला बदाम, काजू, पिस्ता आणि मनुके लागणार आहेत. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी.

बेसन मिल्क केकचे साहित्य

बेसन – 1 कप

दूध पावडर – 1/2 कप

साखर – 1/2 कप

तूप – 1/2 कप

ग्राउंड हिरवी वेलची – 1/4 टीस्पून

स्टेप – 1

कढईत तूप गरम करा. त्यात बेसन घालून मिक्स करा आणि 8-10 मिनिटे चांगले भाजून घ्या. पिवळसर-सोनेरी रंग येऊपर्यंत भाजत रहा.

स्टेप – 2

आता या मिश्रणात दुधाची पावडर वेलची पावडर मिसळा. साहित्य चांगले एकत्र होईपर्यंत मिसळा. मिश्रणात दुधाची पावडर टाकल्यास मिश्रण दाणेदार होईल. मिश्रण थोडं थंड होऊ द्या.

स्टेप – 3

एका पॅनमध्ये साखर आणि 1/2 कप पाणी घाला आणि ते उकळवा. आता त्यात तयार बेसनचे मिश्रण घाला. ते साखरेच्या पाकात चांगले मिसळा. मिश्रण एकसंधता येईपर्यंत शिजवा.

स्टेप – 4

हे मिश्रण कागदाने झाकलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ओता. 1/2 किंवा 1 इंच जाडीने मिश्रण समान प्रमाणात पसरवा. तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सने सजवा आणि मिश्रण 30 मिनिटे बाजूला ठेवा.

बेसनमधील पोषक घटक

बेसन हरभऱ्यापासून तयार केले जाते. त्यात अनेक पोषक घटक असतात. त्यात बी-1, बी-2 आणि बी-9 ही जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. त्यात प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, सोडियम, फायबर, जस्त, तांबे असतात. त्यात फायबर आणि पॉलीअनसॅच्युरेटेड अॅसिड असतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हे तुमचे चयापचय गतिमान करते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. बेसनामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Make special besan milk cake in Diwali 2021)