Health Care : मधुमेहाची समस्या दूर करण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात ‘हे’ बदल करा!

| Updated on: Dec 08, 2021 | 8:58 AM

दिवसेंदिवस मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. अगदी कमी वयामध्ये देखील मधुमेहाची समस्या निर्माण होत आहे. 18 ते 32 वयोगटातील प्री-मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मधुमेह वाढत आहे.

Health Care : मधुमेहाची समस्या दूर करण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात हे बदल करा!
मधुमेह
Follow us on

मुंबई : दिवसेंदिवस मधुमेहाच्या (Diabetes) रूग्णांमध्ये वाढ होत आहे. अगदी कमी वयामध्ये देखील मधुमेहाची समस्या निर्माण होत आहे. 18 ते 32 वयोगटातील प्री-मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मधुमेह वाढत आहे. अनेक केसमध्ये उच्च रक्तदाब देखील संबंधित आहे. पण जर फास्टिंग शुगर टेस्टमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी 95 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.

-अगदी कमी वयामध्ये मधुमेह होण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढलेले वजन, खराब जीवनशैली आणि बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन हे आहे. पिझ्झा, बर्गर, मोमो, चाट, चिकन, कोल्ड्रिंक्स ज्या दराने रोज खाल्ले जातात त्या तुलनेत व्यायाम अजिबात होत नाही. आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.

-आपल्या शरीरातील या सर्व समस्यांसाठी खाण्याच्या सवयी जबाबदार असतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत आहे, तर तुम्हाला आहारातून कार्बोहायड्रेट्स काढून टाकावे लागतील. बाहेरचे जेवण अजिबात चालणार नाही. घरी बनवलेले जेवण खा. अधिक फळे आणि भाज्या खा. दररोज कॅलरीजचे प्रमाण मोजा. भात आणि ब्रेड वगळता ओट्सचा आहारात समावेश करा.

-बरेच लोक संध्याकाळी उशीरापर्यंत जागतात आणि सकाळी 10 वाजता उठतात आणि दुपारी 12 वाजता नाश्ता करतात. यामुळे याचा हानिकारक परिणाम आपल्या शरीरावर होतो.  तुम्ही सकाळी 9.30 च्या दरम्यान नाश्ता केला पाहिजे, त्याचप्रमाणे तुम्ही दुपारचे जेवण 1.330 च्या दरम्यान खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रात्री 9 वाजेपर्यंत जेवण करा. शरीर जसे चांगले राहील तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही चांगले राहील. तुम्ही सकाळी उठून व्यायाम करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..