Eid Ul Fitr 2022 Special : ईदच्या मेजवानीत तयार करा किमामी शेवया, तोंडातच नाही तर नात्यातही येईल गोडवा

| Updated on: May 03, 2022 | 5:59 AM

Ramadan Eid Food Recipe : आज ईद निमित्त मुस्लिम बांधवांच्या घरी अनेक पदार्थ तयार केले जातात. तसेच त्याची चव देखील निराळी असते. ज्यांनी ईदला किमामी शेवयाची चव घेतली आहे. ते नक्की किमामी शेवया घरी बनवतात.

Eid Ul Fitr 2022 Special : ईदच्या मेजवानीत तयार करा किमामी शेवया, तोंडातच नाही तर नात्यातही येईल गोडवा
ईदच्या मेजवानीत तयार करा किमामी शेवया
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पवित्र रमजान महिना (ramadan month) संपत आला आहे. रमजाननंतर सर्वजण ईदची (Eid) आतुरतेने वाट पाहत असतात. जगभरातील मुस्लिमांसाठी हा सर्वात मोठा सण आहे. ईदनिमित्त घरोघरी विविध स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. अशा वेळी तुमचा सण खास बनवण्यासाठी तुम्हालाही काही खास बनवायचे असेल, तर किमामी शेवया (Kimami Sevaiyan) नक्की बनवा. त्यामुळे तोंडातच नाही तर नात्यातही येईल गोडवा येतो. हा पदार्थ बनवायला अत्यंत सोपा आहे. हा पदार्थ कसा तयार करतात त्यांची संपुर्ण माहिती खाली दिली आहे.

किमामी शेवया बनवण्यासाठी लागणारे साहित्य

– 1 कप शेवया
– १ वाटी खवा
– १ कप साखर
– 1 कप दूध
1-1/2 पाणी
– तूप (आवश्यकतेनुसार)
1 टीस्पून वेलची पावडर
-1 कप मखाना, तुकडे करा
– 1/4 कप बदाम (सजावट)
– 1 टीस्पून काजू (गार्निशिंग)
– 1 टीस्पून मनुका (गार्निशिंग)
– 2 चमचे नारळ

किमामी शेवया बनवण्याची पद्धत-

किमामी शेवया बनवण्यासाठी, प्रथम कमी आचेवर पॅन गरम करा. त्यात शेवया कोरड्या भाजा तेही त्याचा रंग गडद तपकिरी होईपर्यंत. शेवया जास्त भाजणार नाहीत याची काळजी सुध्दा घ्या. आता त्याच कढईत तूप गरम करून काजू आणि मखणा कुरकुरीत होईपर्यंत तळा. यासाठी मंद आचेवर फक्त 5 ते 6  मिनिटे तळून घ्या. 5 ते 6 मिनिटांनंतर त्यात ड्रायफ्रुट्स घालून आणखी 2 मिनिटे परतून घ्या. शेवटी, खोबरे लवकर भाजून घ्या. तळलेले साहित्य बाजूला ठेवा. आता एका खोलगट पातेल्यात साखर, खवा, दूध आणि पाणी घालून नीट मिक्स करा. उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहा.

हे सुद्धा वाचा

गॅस कमी करा आणि तयार केलेलं सिरप घट्ट होऊ द्या, ते सतत ढवळत राहा. जेव्हा तुम्हाला वाटेल की ते पूर्णपणे घट्ट झाले आहे. तेव्हा अर्धा कप पाणी आणि दूध घाला आणि सिरप घट्ट होण्यासाठी आणखी एक वेळ उकळू द्या. आता त्यात भाजलेल्या शेवया, ड्रायफ्रूट्स, मखना, खोबरे घालून कमी आचेवर 4  ते 5 मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा. वेलची पूड घाला. चांगले मिसळा आणि 10 मिनिटे झाकून ठेवा. 10 मिनिटांनंतर ते चांगले मिसळा आणि बदाम, काजू आणि मनुका घालून सजवा.