Dark Circles : यें काली काली आखें… कशामुळे उद्भवतो डार्क सर्कल्सचा त्रास ? ‘या’ उपायांनी दूर करा समस्या

| Updated on: May 06, 2023 | 5:04 PM

अनेकांना डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याचा म्हणजेच डार्क सर्कलचा त्रास होतो. यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टी वापरून पाहू शकता.

Dark Circles : यें काली काली आखें...  कशामुळे उद्भवतो डार्क सर्कल्सचा त्रास ? या उपायांनी दूर करा समस्या
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : काळेभोर डोळे सर्वांनाच आवडतात. पण डोळ्यांखालील काळेपणा कोणालाच नको असतो. पण आजकाल अनेक लोकांच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे अथवा डार्क सर्कल्स (Dark Circles) दिसू लागतात. ही डार्क सर्कल्स तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये अपुरी झोप, तणाव, खाण्याच्या अयोग्य सवयी, मद्यपान आणि धूम्रपान इत्यादींचा समावेश होतो. अशा परिस्थितीत बरेच लोक रसायनयुक्त पदार्थ वापरतात. पण त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही. यासोबतच ही उत्पादने महागही (expensive products)असतात.

डार्क सर्कल्सचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपायही करून पाहू शकता. डार्क सर्कल्सची समस्या दूर करण्यासाठी या गोष्टी कामी येतील. आपण कोणत्या गोष्टी वापरू शकतो, ते जाणून घेऊया.

बटाटा

डार्क सर्कल कमी करण्यासाठी तुम्ही बटाटे वापरू शकता. यासाठी बटाटा किसून घ्या. त्याचा रस काढा. तो डोळ्याभोवती लावून ठेवा. बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे त्वचेचा काळेपणा दूर होतो. यामुळे डोळ्यांभोवतीचा सूज कमी होते.

कोरफड

कोरफडीमध्ये एलोसिन असते. त्यामुळे पिगमेंटेशन कमी होते. ते त्वचेला हायड्रेट करते. हे डोळ्यांखालील त्वचा मऊ करते. कोरफडीच्या रसामध्ये लिंबाचा रस, मध आणि गुलाब पाणी मिसळा. या गोष्टी डार्क सर्कल्सवर लावा. यासह काही वेळ डोळ्याभोवती मसाज करा.

बदामाचे तेल

या तेलात व्हिटॅमिन ई असते. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम, कॉपर आणि फॉस्फरस असते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे डोळ्यांभोवतीची त्वचा हायड्रेट करण्याचे काम करते. या तेलाने डोळ्याभोवती काही काळ मसाज करू शकता. हे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे काळी वर्तुळे, थकवा आणि बारीक रेषा कमी होतात. या तेलात तुम्ही मधही घालू शकता.

केशर

थंड दुधात केशराचे काही धागे टाका. काही काळ असेच राहू द्या. यानंतर, कॉटन बॉल वापरून, हे मिश्रण त्वचेभोवती लावा. केशरमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात.