तुमची मुले पाहत असलेल्या ‘गेम्स ॲप’ मधून होतेय लाखोंची कमाई.. मुलांना भुरळ घालण्यासाठी वापरल्या जातात विविध डिझाईन ॲपच्या युक्त्या; जाणून घ्या काय सांगतो अभ्यास

| Updated on: Jun 23, 2022 | 6:31 PM

लहान मुलांनी थोडा वेळ तरी शांत बसावे आणि पालकांना आपले काम करता यावे यासाठी पालक सर्रास मुलांच्या हाती स्मार्टफोन देतात. अडीत ते साडेतीन वर्षाची मुले मोबाईल हाती आला की, विविध गेम, कार्टुन चॅनेल बघतात. परंतु, तुम्हाला माहितीय का मुलांच्या या फोन पाहण्यातून, कुणीतरी कोट्यावधी रूपये कमावत आहे.

तुमची मुले पाहत असलेल्या ‘गेम्स ॲप’ मधून होतेय लाखोंची कमाई.. मुलांना भुरळ घालण्यासाठी वापरल्या जातात विविध डिझाईन ॲपच्या युक्त्या; जाणून घ्या काय सांगतो अभ्यास
तुमची मुले पाहत असलेल्या ‘गेम्स ॲप’ मधून होतेय लाखोंची कमाई
Follow us on

लहान मुलांच्या मोबाईल वापरावर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, साधारण अडीच ते साडेतीन वर्षातील (प्रीस्कुल) मुलं मोबाईलमध्ये वापरत असलेले ॲपमधून मोठ्या प्रमाणात पैसा कमवला जातो. यासाठी ॲप बनविणाऱ्या कंपन्या मुलांच्या आवडीनिवडी आणि बौद्धीक क्षमता (Intellectual capacity) लक्षात घेऊन त्या पद्धतीने ॲप्लिकेशन डिझाईन करतात. आपण सहज खेळण्यास देत असेल्या या चिमुरड्यांच्या वापरातील खेळण्यातील ॲप्लीकेशनमधून रग्गड पैसा उकळला जात असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. असे निष्कर्ष जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये (In the JAMA Network Open Journal) प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे अशिक्षीत आणि कमी शिक्षण घेतलेल्या पालकांची मुले ते ॲप वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्याद्वारे जाहिरातींचे प्रदर्शन वाढवणाऱ्या मॅनिप्युलेटिव्ह पद्धतींचा (manipulative methods) समावेश होतो, जसे की त्यांना जास्त वेळ गेम खेळणे किंवा अॅप-मधील खरेदीला प्रोत्साहन देणे होय.

मुलांचे लक्ष वेधण्यासाठी डिझाईन ट्रिक्स

“मिशिगन युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन हेल्थ सीएस मॉट चिल्ड्रन हॉस्पिटलचे डॉ.जेनी रॅडेस्की (एम.डी.बिहेव्हेरल डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन) यांच्या म्हणण्या नुसार” अभ्यासाचे निष्कर्ष असे सूचित करतात की, मुलांवरील अभ्यासाअंती तंत्रज्ञान कंपन्यांच्या फायद्यासाठी डिझाइन ॲप्लीकेशनमध्ये वैशिष्ट्ये आहेत. त्यातून होणारे ॲडीक्शन आणि आर्थीक लूट थांबवायची असल्यास अधिक कठोर नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. “या डिझाईन ट्रिक्सचा सर्वार्धीक वापर वंचित सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील मुलांद्वारे वापरल्या जाणार्‍या अॅप्समध्ये कमी-अधीक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे या लहान मुलांचे लक्ष वेधून, आर्थिक शोषण करण्यात येत आहे.”

अशिक्षित पालकांची मुले सापडतात जाळ्यात

संशोधकांनी तीन ते पाच वयोगटातील 160 मुलांनी वापरल्या जाणार्‍या अॅप्सचे विश्लेषण केले आणि काही तज्ञांनी “डार्क पॅटर्न” किंवा गेमप्ले पाहण्यासाठी मुलांना रोखता यावे म्हणून काही युक्त्या शोधल्या. परंतु, मुलांना अॅपमध्ये पुन्हा गुंतवण्यासाठी, खरेदीवर दबाव आणण्यासाठी किंवा त्यांना नको असलेल्या जाहिराती पाहण्यास प्रवृत्त केले गेले. पाच पैकी चार अॅप्समध्ये अशा प्रकारचे फेरफार करणारे डिझाईन्स वापरण्यात आल्याचे आढळले. ज्या मुलांचे पालक पदवीधर किंवा उच्चशिक्षित आहेत, अशा मुलांपेक्षा ज्यांचे पालक अल्पशिक्षित, अशिक्षित आहेत अशा घरातील मुलांमध्ये या ॲप्स सर्वाधिक वापरात असल्याचे आढळून आले.

हे सुद्धा वाचा

अशी असतात डिझाइन गेम

पॉप-अप संदेश, जसे की “उद्या परत या आणि एक ड्रॅगन मिळवा” गेम खेळण्यास प्रवृत्त करण्यासाठी किंवा “तुम्ही या गोंडस लहान प्राण्यांसोबत निशुल्क खेळू शकता, असे प्रलोभन देण्यात येते, अॅप-मधील खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी फक्त तुमच्या पालकांना सांगा”.”फक्त तिथे उभे राहू नका, काहीतरी करा!” सारख्या गोष्टी सांगणारी पात्रे जेव्हा मुले निष्क्रिय असतात, त्यांना खेळत ठेवण्यासाठी. मुलाने प्रॉम्प्टचे पालन केले नाही तेव्हा रडणारे पात्र दर्शविणारे अॅपच्या सशुल्क आवृत्तीच्या विनामूल्य चाचण्यांसाठी साइन ॲप करण्यासाठी सूचित करते. “मला वाचवा!” असे ओरडणारे पात्र काउंटडाउन घड्याळाच्या बनावट वेळेच्या दबावासह, गेममध्ये दीर्घकाळापर्यंत गेम वापरण्यास उद्युक्त करण्यासाठी विराम देताना दर्शविला जातो. विविध गेममधून, मुलांना आकर्षक कार्टून, स्टिकर्स, गेम कॅरेक्टर मधून आकर्षित केले जाते. पालकांनी अशा गेम शो अॅपमध्ये आपल्या मुलांना गुंतविण्यापासून वाचविले पाहिजे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.