AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | या 4 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि शरीरातील ऑक्सिजनची कमतरता कायमची मिटवा!

किवी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. किवी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच आपल्या शरीरातील पेशी वाढवण्यासही मदत करते. व्हिटॅमिन सी किवीमध्ये अधिक प्रमाणात आढळते. किवीमध्ये फायबर देखील भरपूर असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदय निरोगी ठेवण्यासोबतच शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासही किवी खूप जास्त मदत करते.

Health | या 4 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि शरीरातील ऑक्सिजनची कमतरता कायमची मिटवा!
Image Credit source: patrika.com
| Updated on: Jun 23, 2022 | 8:34 AM
Share

मुंबई : शरीरात ऑक्सिजनच्या (Oxygen) कमतरतेमुळे श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू लागतात. जर तुम्हालाही ऑक्सिजन कमी होण्याची समस्या असेल तर विशेष काळजी घ्यावी लागेल. यासाठी आपण आहारामध्ये काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश करायला हवा. ज्यामुळे ऑक्सिजन कमी होण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. आपल्या शरीरात रक्ताचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुठल्याही आजाराचे निदाने हे प्रामुख्याने रक्तनमुन्यांच्या माध्यमातूनच होत असते. मानवी शरीरात रक्तपातळी (Blood pressure) ठरावीक मर्यादेत असणे अत्यंत आवश्‍यक असते. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरातील प्रत्येक क्रिया व्यवस्थित होण्यासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा (Important) आहे. नेमके कोणते पदार्थ आहेत, जे आपल्या शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यास मदत करतात. याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

किवी

किवी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. किवी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच आपल्या शरीरातील पेशी वाढवण्यासही मदत करते. व्हिटॅमिन सी किवीमध्ये अधिक प्रमाणात आढळते. किवीमध्ये फायबर देखील भरपूर असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदय निरोगी ठेवण्यासोबतच शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासही किवी खूप जास्त मदत करते. यामुळे आपण आठवड्यातून किमान दोन वेळातरी किवीचे सेवन करायला हवे.

पपई

पपईच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर काढतात. तज्ज्ञांच्या मते, पपईमध्ये वाईट कोलेस्टेरॉल बाहेर काढण्याचे गुणधर्म आहेत. जेव्हा असे होते तेव्हा ऑक्सिजनचा प्रवाह देखील चांगला होण्यास मदत होते. यामुळे आपण नेहमीच पपईचे सेवन करायला हवे.

नाशपाती

नाशपाती हे फळ बाराही महिने बारामध्ये सहज मिळते. नाशपातीमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, प्रथिने आणि इतर पोषक तत्व मोठ्या प्रमाणात आढळतात. विशेष म्हणजे नाशपाती खाऊन तुम्ही ऑक्सिजनची पातळी देखील सुधारू शकता. याचे सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहू शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये नाशपातीचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.

खजूर

खजूरचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. खजूरमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. खजूरमध्ये तांबे, फॉस्फरस, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते. खजूरचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करते. दररोज सकाळी दूधासोबत आपण जर दोन खजूरचे सेवन केले तर ते अधिक फायदेशीर ठरते.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.