Ajit Pawar Last Video | मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे; अजित दादांचा तो व्हिडीओ पुन्हा चर्चेत
अजित पवार यांच्या निधनापूर्वीचा एक प्रचारात्मक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी मतदारांना आवाहन करण्यासाठी तयार करण्यात आला होता.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. मात्र, या राजकीय घडामोडींना पूर्णविराम देत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनापूर्वीचा एक प्रचारात्मक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी मतदारांना आवाहन करण्यासाठी तयार करण्यात आला होता.
या व्हिडीओमध्ये अजित पवार म्हणताना दिसत आहेत की, “गावापासून ते जिल्ह्यापर्यंतचा सर्वांगीण विकास कोणाच्या हातात द्यायचा, हे ठरवण्याची हीच खरी वेळ आहे.” तसेच जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते. “मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणं हीच माझी ओळख आहे,” असे ठाम वक्तव्यही त्यांनी या व्हिडीओमध्ये केले होते. यासोबतच त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना साथ देण्याचे आणि संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. “तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही,” असा ठाम विश्वास अजित पवार यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केला होता. त्यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Published on: Feb 05, 2026 05:36 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

