Sanjay Raut | तशी मोदी आणि शाह यांचीही इच्छा नसावी; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊतांनी विशेषतः सुनील तटकरे यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, “राष्ट्रवादीचे सुनील तटकरे शरद पवारांना मार्गदर्शन करतात, ही गम्मत वाटतेय.” सध्याच्या राजकीय परिस्थितीत अजित पवारांच्या गटामधील विलीनीकरणाची प्रक्रिया जोरात सुरु आहे, असे राऊतांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊतांनी विशेषतः सुनील तटकरे यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, “राष्ट्रवादीचे सुनील तटकरे शरद पवारांना मार्गदर्शन करतात, ही गम्मत वाटतेय.” सध्याच्या राजकीय परिस्थितीत अजित पवारांच्या गटामधील विलीनीकरणाची प्रक्रिया जोरात सुरु आहे, असे राऊतांनी सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार गटाकडून विलिनीकरणावर जोर देण्यात येत आहे. मात्र, अजितदादा गटातील शरद पवार यांचे एकेकाळचे चेलेच या विलिनीकरणाला विरोध करत असून पवारांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. अजित पवार गटाचे नेते ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत, त्यावरून स्पष्ट होते की शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला या विलीनीकरणात पूर्णपणे सहभागी करून घेण्याची अजितदादांच्या गटाची इच्छा नाही, असा दावा करतानाच अमित शाह आणि नरेंद्र मोदींचीही तशीच इच्छा असावी, असा चिमटाही त्यांनी काढला.
Published on: Feb 05, 2026 02:24 PM
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....

