Nashik Rajma Farming | दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती; शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग चर्चेत
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा राजमा पिकवण्याचा निर्णय नारायण शिंदे यांनी घेतला. कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे हे पीक येवला तालुक्याच्या हवामानात यशस्वी ठरेल का, याबाबत सुरुवातीला साशंकता होती. मात्र योग्य नियोजन, कमी पाण्यात येणारी लागवड आणि नियमित देखरेखीमुळे राजमाची शेती यशस्वी ठरली आहे.
दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतीला नवी उमेद मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असली, तरी कांद्याला सध्या बाजारात अत्यल्प दर मिळत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत येवला तालुक्यातील आडगाव चौथा येथील शेतकरी नारायण शिंदे यांनी एक आगळावेगळा आणि यशस्वी प्रयोग केला आहे.
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा राजमा पिकवण्याचा निर्णय नारायण शिंदे यांनी घेतला. कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे हे पीक येवला तालुक्याच्या हवामानात यशस्वी ठरेल का, याबाबत सुरुवातीला साशंकता होती. मात्र योग्य नियोजन, कमी पाण्यात येणारी लागवड आणि नियमित देखरेखीमुळे राजमाची शेती यशस्वी ठरली आहे.
या प्रयोगासाठी शिंदे यांनी सुमारे 18 हजार रुपयांचा खर्च केला असून, त्यातून सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Published on: Feb 05, 2026 01:46 PM
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात