Baramati | तीन कळीचे मुद्दे… पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
बारामतीतील विद्याप्रतिष्ठान येथे आज पवार कुटुंबाची महत्वाची बैठक आहे. या बैठकीसाठी पार्थ पवार, जय पवार यांच्यासह सकाळीच शरद पवार देखील उपस्थित झाले आहेत. बैठकीत रोहित पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार यांसह कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले. बैठकीदरम्यान चर्चेच्या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झाले आहे.
बारामतीतील विद्याप्रतिष्ठान येथे आज पवार कुटुंबाची महत्वाची बैठक आहे. या बैठकीसाठी पार्थ पवार, जय पवार यांच्यासह सकाळीच शरद पवार देखील उपस्थित झाले आहेत. बैठकीत रोहित पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार यांसह कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले. बैठकीदरम्यान चर्चेच्या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झाले आहे. पहिला मुद्दा म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मारकाचा प्रश्न. दुसरा मुद्दा म्हणजे अजित पवार हे विद्या प्रतिष्ठान येथील विश्वस्त आहेत, मात्र त्यांच्या जागी त्यांच्या दोन सुपुत्रांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे, याशिवाय, राज्यात सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय असलेला राष्ट्रवादी पक्षाचा विलीनीकरणाचा मुद्दा ही या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. मात्र बैठकीत काय निर्णय होतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: Feb 05, 2026 01:33 PM
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल

