देशातील सर्वात लोकप्रिय आणि अनुभवी नर्तकांपैकी एक ‘अनिशा दलाल’च्या यशाची कहाणी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : एखाद्याचं नाव हे त्याच्या कर्तृत्वाने होत असतं. स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अनेक अग्नीपरीक्षा पार कराव्या लागतात आणि त्यातून निर्माण होते स्वतःची ओळख, नाव. परंतु त्यामागची मेहनत काय असते आणि कशाप्रकारचा संघर्ष केलेला असतो हे आपल्याला क्वचितच माहित असेल. असे अनेक कलाकार आहेत ज्यांची मेहनत, ओळख नेहमीच पडद्यामागे राहते. आज आपण जागतिक महिला दिनाच्या […]

देशातील सर्वात लोकप्रिय आणि अनुभवी नर्तकांपैकी एक ‘अनिशा दलाल’च्या यशाची कहाणी
Follow us on

मुंबई : एखाद्याचं नाव हे त्याच्या कर्तृत्वाने होत असतं. स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अनेक अग्नीपरीक्षा पार कराव्या लागतात आणि त्यातून निर्माण होते स्वतःची ओळख, नाव. परंतु त्यामागची मेहनत काय असते आणि कशाप्रकारचा संघर्ष केलेला असतो हे आपल्याला क्वचितच माहित असेल. असे अनेक कलाकार आहेत ज्यांची मेहनत, ओळख नेहमीच पडद्यामागे राहते. आज आपण जागतिक महिला दिनाच्या औचित्याने अशाच एका हुरहुन्नरी डान्सर आणि मॉडेल अनिशा दलाल बद्दल जाणून घेऊया.

अनिशा दलाल हिचा जन्म सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासूनच अनिशाला नृत्याची आवड होती. शाळा-कॉलेजमध्ये, कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये ती मोठ्या उत्साहाने भाग घेत असे. त्यामुळे तिला नृत्याची गोडी लागली. नृत्यातील सगळे प्रकार तिला शिकायचे होते. त्यासाठी 1995 मध्ये तिने शामक दावरच्या ओव्हायपी उपक्रमामध्ये भाग घेतला आणि याचा फायदा तिला उत्तम डान्सर सोबतच डान्स कोरिओग्राफर बनण्यासाठी झाला. यामध्येच तिने करिअर करायचे ठरवले. 90 च्या दशकात सामान्य घरातील मुलीने नृत्य आणि मॉडेलिंगचा विचार करणं सामान्य गोष्ट नव्हती. मात्र, तिचे आई-वडील आधुनिक विचाराचे असल्याने घरातून तिला पाठिंबा मिळाला.

1995 मध्ये ओव्हायपीच्या पहिल्या बॅचमधून अनिशा दलाल नृत्य दिग्दर्शक बनली. दोन दशकाहून अधिक कालावधीच्या प्रवासामध्ये, अनिशाने देशातील नृत्य आणि फिटनेसचा चेहरा बदलला आहे. नृत्याचा आनंद घेणारी एक व्यक्ती ते आज 20 वर्षांपेक्षा जास्त अध्यापनाच्या अनुभवासह शामक दावर डान्स कंपनीची मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तिने सहा वर्षे बॅलेटचा अभ्यास डेबी अलेन डान्स अकादमी, हार्बर डान्स सेंटर आणि पायनॅपल डान्स स्टुडिओसारख्या आंतरराष्ट्रीय नृत्य संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले. वेगाने भारतातील दहा सर्वोत्कृष्ट महिलांपैकी तिची निवड केली होती. शाहरुख खानने ‘रब ने बनादी जोडी’ या चित्रपटा दरम्यान तिला मादोना मॅडम संबोधले. ही तिच्यासाठी सर्वात मोठी कौतुकाची थाप होती.

अनिशाला शामकसह आईबीएन-7 कडून गुरु शिष्य पुरस्कारही मिळाला आहे. तिने कोक, क्लोज अप, रिलायन्स, सॅमसंग वॉशिंग मशीन, लिरील, एले 18 आणि अॅदिदास या ब्रॅण्डसाठी मॉडेल म्हणूनही काम केले आहे. मॉडेल म्हणून बरेच काम केले असले तरी, अनिशाने आपले जीवन नृत्यास समर्पित केले आहे. तिला रॉयल अकादमी ऑफ डान्स, लंडन येथे डिस्टिंक्शन मिळाले आहे. सध्या ती राष्ट्रीय डान्स अकादमीची (एसडीआयपीए) प्रमुख आहे.

देशातील सर्वात लोकप्रिय आणि अनुभवी नर्तकांपैकी एक, अनिशा म्हणते, “ओआयपी देशातील सर्वोत्तम नृत्य कार्यक्रम आहे. शामक असं काय जादू करतो की, वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे शिकायला येतात. त्यांची पहिल्या दिवसापासून ते पदवीधर होईपर्यंतच्या परिवर्तनाचा प्रवास अद्भुत असतो. नृत्य करण्यासोबत तिथे बरंच काही शिकायला मिळतं. परंतु हे सगळं करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असणे गरजेचं आहे.”