चेहराच नव्हे या डी-टॅन पॅकने हाता-पायाचे टॅनिंगही लगेच होईल दूर

| Updated on: Aug 11, 2023 | 2:14 PM

उन्हामुळे त्वचेवर झालेले टॅनिंग हटवण्यासाठी या मास्कचा वापर करता येऊ शकतो. या मास्कचा परिणाम अवघ्या काही वेळात दिसून येतो.

चेहराच नव्हे या डी-टॅन पॅकने हाता-पायाचे टॅनिंगही लगेच होईल दूर
Image Credit source: freepik
Follow us on

Tanning Removal : उन्हामुळे बऱ्याच वेळेस आपल्या शरीरावर तसेच चेहऱ्यावर परिणाम होतो, अनेकांना टॅनिंगचा (tanning) त्रासही होतो. टॅनिंगमुळे त्वचेवर काळसरपणा दिसू लागतो आणि मळ साचल्यासारखे दिसू लागते. अशा वेळेस टॅनिंग घालवण्यासाठी डी-टॅन पॅकचा (D-Tan Pack) वापर उपयोगी ठरू शकतो. हा पॅक बनवणे अतिशय सोपे असून त्याचा परिणामही लगेचच दिसून येतो. तुम्ही हा पॅक, चेहरा, मान, गळा यासोबत तुमच्या हाता-पायांवरही लावू शकता.

हा पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

टॅनिंग हटवण्यासाठी डी-टॅन पॅक

हा डी-टॅन पॅक घरी बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा कॉफी पावडर घ्यावी. नंतर त्यामध्ये एक चमचा मध घालावा. तसेच एक बटाटा घेऊन त्याचे साल काढून तो किसा आणि त्याचा एक चमचा रसही बाऊलमधील मिश्रणात घालावा. नंतर त्यामध्ये एक चमचा चंदनाची पावडर घालावी आणि सर्व मिश्रण नीट एकजीव करावे. तुमचा डी-टॅन पॅक तयार आहे. नंतर हा पॅक जिथे-जिथे टॅनिंग झाले असेल तिथे नीट लावा आणि थोडा मसाज करा. सुमारे 15 मिनिटांनी हा पॅक वाळू लागेल, तेव्हा एका सुती कापड किंवा रुमाल ओला करून घ्यावा व डी-टॅन पॅक पुसून काढा. त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ धुवावी.

हळूहळू या डी-टॅन पॅकचा परिणाम दिसू लागेल व काळवंडलेली त्वचा पूर्ववत होईल. त्वचेवरील चमक परत येईल. हा डी-टॅन पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता. नियमित वापराने फरक दिसून येईल.

हे उपायही ठरतील फायदेशीर

– टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटोचा रस देखील लावता येतो. टोमॅटोच्या रसाने टॅनिंग कमी होण्यास मदत होते.

– टॅन झालेल्या त्वचेवर बटाट्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून चोळल्याने त्वचा स्वच्छ होते.

– कॉफी आणि मध एकत्र मिसळून ते लावल्यासही तुम्ही टॅनिंगपासून मुक्त होऊ शकता.

– कोरफडीचा गर त्वचेवर चोळल्याने टॅनिंगच्या समस्येवरही मात करता येते. तसेच उन्हामुळे प्रभावित झालेल्या त्वचेला आराम मिळतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)