कोळसा पुरवठ्यासाठी 1 हजार पँसेजर रद्द; तुम्ही लोकं आम्हाला छळता; दानवेंनी ब्राह्मण मुख्यमंत्री वादाचे खापर माध्यमांवर फोडले

| Updated on: May 07, 2022 | 6:31 PM

परभणीः केंद्र सरकारची जबाबदारी ही राज्यांना कोळसा पुरवायची आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने 1 हजार पॅसेंजर ट्रेन रद्द (1 thousand passenger trains canceled) करून, त्या केवळ कोळसा पुरवठ्यावर (coal supply) लावले असल्याची माहिती, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State for Railways Raosaheb Danve) यांनी दिले आहे. यावेळी ब्राह्मण मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी वक्तव्याविषयी विचारले […]

कोळसा पुरवठ्यासाठी 1 हजार पँसेजर रद्द; तुम्ही लोकं आम्हाला छळता; दानवेंनी ब्राह्मण मुख्यमंत्री वादाचे खापर माध्यमांवर फोडले
कोळसा पुरवठ्यासाठी 1 हजार ट्रेन रद्द करण्यात
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

परभणीः केंद्र सरकारची जबाबदारी ही राज्यांना कोळसा पुरवायची आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने 1 हजार पॅसेंजर ट्रेन रद्द (1 thousand passenger trains canceled) करून, त्या केवळ कोळसा पुरवठ्यावर (coal supply) लावले असल्याची माहिती, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State for Railways Raosaheb Danve) यांनी दिले आहे. यावेळी ब्राह्मण मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी वक्तव्याविषयी विचारले असता, त्यांनी हा मुद्दा माध्यमांवरच ढकलून दिला, व सांगितले की, मुख्यमंत्री पद कोणासाठीही राखीव नसल्याचेही त्यांनी सांगितले. ते परभणीमध्ये कृषी महोत्सवानिमित्त आले असता, पत्रकारांशी बोलत होते.

परभणी येथे कृषी संजीवनी महोत्सव सुरू असून, तीन दिवसीय कार्यक्रमांच्या, दुसऱ्या दिवशी रावसाहेब दानवे यांनी जेव्हा या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कोळसा या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी कृषी प्रदर्शनातील स्टॉलला भेटी घेत ,माहिती त्यांनी घेतली.

‘ब्राह्मण मुख्यमंत्री’ हे पद कोणासाठीही राखीव नाही

काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी राज्याला ब्राह्मण मुख्यमंत्री असावा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी आपल्या वक्तव्याची बाजू न मांडता ती बाजू वृत्तवाहिन्यावरच ढकलून दिले. माध्यमांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, तुम्ही लोक आम्हाला छळण्यासाठी हे करता, मी बोललो, त्याच्या अगोदरचे आणि नंतरचे तुम्ही दाखवत नाही. आणि नंतरही दाखवत नाहीत. मी जे बोललो, ते माझ्या अगोदरच्या वक्त्याच्या भाषणाला अनुसरून होतं. मुख्यमंत्रीपद हे कोणासाठीही राखीव नसते. गुणवत्तेवर ते पद मिळते, पण राईचा पर्वत तुम्हीच करता, असा आरोपही त्यांनी माध्यमांवर केला.

आरक्षणाच्या मुद्यावर मविआ सरकार अपयशी

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावदेखील दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. दोन वर्षांपासून न्यायालयाकडून एम्पिरिकल डाटा मागिविला असतानाही हे सरकार देऊ शकले नाही आणि आता डिसेंबरपर्यंत मुदत मागत आहेत. यावेळी आरक्षणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असले या सर्व पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे आणि हे अपयशी ठरले की हे केंद्राकडे बोट दाखवतात, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधाला सावध भूमिका

राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला भाजप खासदाराकडून होणार याविरोधा बद्दल विचारले असता दानवे यांनी सावध भूमिका घेत मी रात्रभर प्रवास करून आलोय त्यामुळे मला याबाबत माहिती नाही . माहिती घेऊन कळवतो अशी प्रतिक्रिया दिली .