Ganapati Visarjan 2022: शॉकिंग… विसर्जन करताना पनवेलमध्ये 11 जणांना वीजेचा शॉक

| Updated on: Sep 09, 2022 | 11:33 PM

पनवेलमध्ये वडघर येथील गणेश विसर्जन घाटाजवळ ही दुर्घटना घडली आहे. विसर्जनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील 10 जणांना विजेचा शॉक लागला आहे.

Ganapati Visarjan 2022: शॉकिंग... विसर्जन करताना पनवेलमध्ये 11 जणांना वीजेचा शॉक
Follow us on

पनवेल : राज्यात भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. अशातच गणेश विसर्जनाला(Ganapati Visarjan) गालबोट लागणारी धक्कादायक घटना पनवेलमध्ये(Panvel) घडली आहे. विसर्जना दरम्यान 11 जणांना विजेचा शॉक(Electrical shock) लागला आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले.

दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाच्या निरोपाची वेळ आली. अशातच पनवेलमध्ये विसर्जादरम्यान एक दुर्घटना घडली आहे. पनवेल मधील वडघर गावात विसर्जनादरम्यान 11 जणांना विजेचा शॉक लागला आहे.

पनवेल शहर पोलिस ठाणे हद्दीत उरण नाका येथील वडघर खाडी किनारी विसर्जन सुरु असताना ही दुर्घटना घडली. सायकाळी गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी आलेल्या 11 भाविकांना विजेचा शॉक लागला.

यापैकी ६ जण पनवेल उपजिल्हा रुग्णालयाय येथे उपचार घेत आहेत. पटवर्धन हॉस्पिटल याठिकाणी दोन जण दाखल असून, लाईफ लाईन हॉस्पिटल येथे दोघांना भरती करण्यात आले आहे. पटेल हॉस्पिटल पनवेल याठिकाणी एका व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.

पनवेलमध्ये वडघर येथील गणेश विसर्जन घाटाजवळ ही दुर्घटना घडली आहे. विसर्जनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील 10 जणांना विजेचा शॉक लागला आहे.

वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटाजवळ गणेशभक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी जनरेटर लावण्यात आलाय. परंतु  मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि मानस कुंभार या तरुणाच्या अंगावर पडल्याने त्याला विजेचा शॉक लागला. हे पाहून त्याचे कुटुंबीय वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही विजेचा शॉक बसला. या दुर्घटनेत पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील एकाच कुटुंबातील 10 जणांना विजेचा शॉक बसला आहे.

सर्वम पनवेलकर, तनिष्का पनवेलकर, दिलीप पनवेलकर, निहार चोणकर, दीपाली पनवेलकर, वेदांत कुंभार, दर्शना शिवशिवकर, प्रसाद पनवेलकर या सहा जणांवर उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचार सुरू आहेत. तर हर्षद पनवेलकर व मानस कुंभार यांच्यावर लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रुपाली पनवेलकर यांच्यावर पटवर्धन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेचे वृत्त समजताच माजी सभागृहनेते परेश ठाकूर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी- कर्मचारी, महापालिकेचे उपायुक्त, सर्व अधिकारीवर्ग आदींनी रुग्णालयात धाव घेतली असून अपघातग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जात आहे. तर या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.