Special Report | साई रिसॉर्टवर कारवाई होणार म्हणून किरीट सोमय्या दापोलीत, पण हातोडा पडला दुसऱ्याच रिसॉर्टवर!

| Updated on: Nov 22, 2022 | 10:33 PM

अनिल परबांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप, सोमय्या वर्षभरापासून करत आहे. हा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यासाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले. हातोडाही मारला, पण तो साई रिसॉर्ट नाहीय. नेमकं काय घडलंय, याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट!

Special Report | साई रिसॉर्टवर कारवाई होणार म्हणून किरीट सोमय्या दापोलीत, पण हातोडा पडला दुसऱ्याच रिसॉर्टवर!
Follow us on

रत्नागिरी : शिवसेनेचे नेते अनिल परब यांचं दापोलीतलं साई रिसॉर्ट पाडण्यासाठी हातोडा घेऊन आल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. कर्मचारी ओरिजनल आणि सोमय्यांनी प्रतिकात्मक हातोडा मारलाही पण साई रिसॉर्टवर नाही. तर साई रिसॉर्टच्या बाजूला असलेल्या सी कोच रिसॉर्टच्या परिसरात!

पाडकाम सुरु झाल्याचं सांगून किरीट सोमय्यांनी पुढच्या 40 दिवसांत दोन्ही रिसॉर्ट जमीनदोस्त होईल असा दावाही केला. पण अद्याप तरी साई रिसॉर्टवर पाडकामाची कारवाई सुरु झालेली नाही. कारण अजून साई रिसॉर्टची वर्क ऑर्डर आली नाही. तर साई रिसॉर्टच्या बाजूला असलेल्या सी कोच रिसॉर्टची ऑर्डर निघाली. त्यामुळे सी कोच रिसॉर्टच्या परिसरात हातोडा चालवण्यात आला.

कोरोनाच्या काळात 25 कोटी खर्चून, बेकायदेशीरपणे समुद्रकिनारी अनिल परबांनी रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला. मात्र हा रिसॉर्ट माझा नसून सदानंद कदमांचा आहे. त्यामुळं आता सोमय्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा परबांनी दिलाय.

हे सुद्धा वाचा

अनिल परबांनी रिसॉर्टवरुन आरोप फेटाळलेत. रिसॉर्टवर कारवाईही सुरु झालीय. आता लवकरच परबांना जेलमध्ये जावं लागेल, असा इशारा पुन्हा एकदा सोमय्यांनी दिलाय. तर जे शिंदे गटात गेलेत त्यांच्याकडे, सोमय्या हातोडा घेऊन का जात नाही? असा सवाल अनिल परबांनी केलाय.

सी कोच रिसॉर्टवर कारवाई सुरु झालीय. आता पण ज्या रिसॉर्टवर हातोडा मारण्यासाठी सोमय्या दापोलीला गेले. त्या रिसॉर्टची वर्क ऑर्डर न आल्यानं सोमय्यांना त्या रिसॉर्टवर हातोडा मारता आला नाही.