नाशिक शहरातील मोहीम मालेगाव शहरातही राबवणार, सुरुवातीला जनजागृती नंतर थेट कारवाईच

| Updated on: Dec 09, 2022 | 2:12 PM

प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतिने सध्या जनजागृती मोहीम राबविली जात आहे. नवीन वर्षात 1 तारखेपासून हेल्मेट सक्ती केली जाणार आहे.

नाशिक शहरातील मोहीम मालेगाव शहरातही राबवणार, सुरुवातीला जनजागृती नंतर थेट कारवाईच
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मनोहर शेवाळे, मालेगाव ( नाशिक ) : नाशिक शहर पोलिसांपाठोपाठ आता ग्रामीण पोलीसांनी हेल्मेट सक्तीकडे मोर्चा वळविला आहे. नाशिकच्या मालेगाव शहरात हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. नवीन वर्षात मालेगाव शहरात हेल्मेट सक्ती लागू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामीण पोलिसांचे मनुष्यबळ बघता प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहाय्याने ही मोहीम राबविली जाणार आहे. मालेगाव शहारातील दुचाकीची वाढलेली संख्या, बेशिस्त वाहन चालविणे, नियमबाह्य दुचाकीवापरणे यांसह हेल्मेटचा वापर न करणे, फेटल अशा विविध बाजू बघता विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. महिनाभर जनजागृती केली जाणार असून त्यानंतर हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. या दरम्यान ड्रायव्हिंग स्कूल, दुचाकी विक्रेते आणि सामाजिक संस्था यांचीही मदत घेतली जाणार आहे.

नाशिक शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. नवीन वर्षात याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतिने सध्या जनजागृती मोहीम राबविली जात आहे. नवीन वर्षात 1 तारखेपासून हेल्मेट सक्ती केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक शहरात हेल्मेटचा वापर केला जात नसेल तर त्या दुचाकी चालकाला पाचशे रुपयांचा दंड आकारला जात आहे.

नाशिक शहरात जनजागृती मोहीम राबवत असतांना दोन तास समुपदेशन, नो हेल्मेट नो पेट्रोल, शासकीय कार्यालयात नो हेल्मेट नो एंट्री अशा विविध प्रकारच्या मोहिमा राबविण्यात आल्या होत्या.

त्यानंतर नाशिक शहरात 1 डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. त्यासाठी चेकिंग पॉइंट ठरवून देण्यात आले असून पाचशे रुपये दंडाची कारवाई केली जात आहे.

त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या ग्रामीण भागातील शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. त्याकरिता प्रादेशिक परिवहन विभागाने जनजागृती सुरू केली आहे.