अनिल देशमुख यांच्याविरोधात कटकारस्थान, NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग आरोपी का नाहीत ?- नवाब मलिक

| Updated on: Sep 08, 2021 | 6:21 PM

परमबीरसिंग यांना वाचवण्यासाठी NIA ने त्यांना आश्वासित केले. त्यामुळेच NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

अनिल देशमुख यांच्याविरोधात कटकारस्थान, NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग आरोपी का नाहीत ?- नवाब मलिक
nawab malik and paramvir singh
Follow us on

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आले. परमबीरसिंग यांना वाचवण्यासाठी NIA ने त्यांना आश्वासित केले. त्यामुळेच NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर भाजपच्या माध्यमातून खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान झाले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते. (allegations made on Anil Deshmukh are falls why Parambir Singh is not accused in NIA chargesheet Nawab Malik ask question)

बोगस पुराव्यांसाठी पाच लाख रुपये दिले 

यावेळी बोलताना NIA ने जी चार्जशीट दाखल केली आहे, त्यामध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी परमबीरसिंग यांनी पैसे दिले होते. त्यांनी 5 लाख रुपये माजी दिले होते, अशी माहिती सायबर एक्स्पर्टने दिली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

देशमुख यांच्यावर आरोप केल्याने परमबीरसिंग यांना जीवदान

तसेच पुढे बोलताना, “NIA ने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आले नाही. एक्स्टॉरशनसाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे यांनी केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असं आमचं मत नाही. बरचसं काही यातून बाहेर येऊ शकत होतं. परंतु NIA ने तसा काही तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान देण्यात आलंय,” असा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

स्फोटकं ठेवल्याप्रकरणी 4 सप्टेंबर रोजी चार्जशीट

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी 4 सप्टेंबर रोजी एनआयए कोर्टात दहा हजार पानांची चार्जशीट सादर करण्यात आली. यामध्ये अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं का ठेवली, याचं कारण देण्यात आलंय. याच चार्जशीटवर आक्षेप घेत त्यामध्ये परमबीरसिंग यांचे नाव का नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

इतर बातम्या :

Ganesh Chaturthi Guidelines 2021 : मंडपात मुखदर्शन नाहीच, राज्य सरकारकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर

सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही, नवाब मलिक यांचं मोठं विधान; राष्ट्रवादीही ‘स्वबळा’च्या मूडमध्ये?

करुणा शर्मांच्या मुंबईतील घराची तपासणी, बीड पोलिसांचं पथक मुंबईत; नेमकं प्रकरण काय?

(allegations made on Anil Deshmukh are falls why Parambir Singh is not accused in NIA chargesheet Nawab Malik ask question)