AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करुणा शर्मांच्या मुंबईतील घराची तपासणी, बीड पोलिसांचं पथक मुंबईत; नेमकं प्रकरण काय?

बीड पोलिसांचं पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीनं पुढील तपास करण्यात येत आहे. बीड पोलिसांकडून करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन केलं जात आहे. करुणा शर्मा या रविवारी परळीमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीत एक पिस्तूल आढळून आलं होतं.

करुणा शर्मांच्या मुंबईतील घराची तपासणी, बीड पोलिसांचं पथक मुंबईत; नेमकं प्रकरण काय?
करुणा शर्मा
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 5:01 PM
Share

मुंबई : करुणा शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाता बीड पोलिसांचं एक पथक करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे. सकाळी हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीनं पुढील तपास करण्यात येत आहे. बीड पोलिसांकडून करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन केलं जात आहे. करुणा शर्मा या रविवारी परळीमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीत एक पिस्तूल आढळून आलं होतं. (Beed police team arrived in Mumbai to inspect Karuna Sharma’s house in Mumbai)

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल आढळल्यानंतर त्यांच्या गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर करुणा शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्या बीड जिल्हा कारागृहात आहेत. त्यानंतर आज बीड पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल झालं आहे. करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी बीड पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. आता शर्मा यांच्या घरातून पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नेमकं काय घडलं?

शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.

व्हायरल व्हिडीओत काय?

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

‘परळी सुन्न, राज्याची मान खाली गेली’

“अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची !!”, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावर भाष्य केलंय. याद्वारे पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.

करुणा शर्मांच्या समर्थनात भाजप मैदानात उतरणार

दुसरीकडे करुणा शर्मांच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरणार आहे, तशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केलीय. करुणा शर्मा यांच्यावर अन्याय झालाय. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे. त्यांच्या गाडीत पिस्तूल टाकण्यात आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी भाजपकडून करण्यात आलीय. तसंच करुणा शर्मा यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय.

इतर बातम्या :

‘सहकारामधील स्वाहाकार संपण्याच्या भीतीपोटीच आरबीआयच्या नियंत्रणाला पवारांचा विरोध’, भाजपचा पलटवार

‘बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव’, फडणवीसांचा घणाघात

Beed police team arrived in Mumbai to inspect Karuna Sharma’s house in Mumbai

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...