बीड: करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पिवळी ओढणी ओढलेली एक तरुणी शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (pistol putting in Karuna Munde’s car, devendra Fadnavis demand enquiry)