दहावीच्या अभ्यासात मदतीचा बहाणा, नवी मुंबईत 17 वर्षांच्या चुलत भावाकडून बलात्कार, पीडिता गर्भवती

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 06, 2021 | 12:13 PM

पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, ती गेल्या काही महिन्यांपासून आरोपीच्या घरी जात होती. अभ्यासाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोपही तिने केला.

दहावीच्या अभ्यासात मदतीचा बहाणा, नवी मुंबईत 17 वर्षांच्या चुलत भावाकडून बलात्कार, पीडिता गर्भवती
अल्पवयीन मुलीवर चुलत भावाचे अत्याचार
Follow us

नवी मुंबई : दहावीच्या अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणाने आपल्याच चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे 15 वर्षीय विद्यार्थिनी गरोदर राहिली असून 17 वर्षीय आरोपी तरुणावर डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईतील जुईनगर परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

पीडितेचा आरोप काय

पीडित अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे. आरोपी चुलत भाऊ आणि पीडिता हे जुईनगर भागात एकाच परिसरात राहत असल्याची माहिती आहे. आरोपी पीडितेला दहावीच्या अभ्यासात मदत करायचा. आपल्या जबाबात, पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, ती गेल्या काही महिन्यांपासून आरोपीच्या घरी जात होती. अभ्यासाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोपही तिने केला.

गर्भपातास बालकल्याण समिती अनुत्सुक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तिचे कुटुंब तिला डोंगरीतील बालगृहात घेऊन आले. शुक्रवारी मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले, तिथे पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. कोर्ट गर्भपात करण्याच्या बाजूने नाही, कारण तिचा गर्भ आठ महिन्यांचा आहे. त्यामुळे तिचा जीव धोक्यात येऊ शकतो.

पॉक्सो अंतर्गत आरोपीवर गुन्हा

डोंगरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक शबाना शेख यांनी गुन्ह्याच्या नोंदणीला दुजोरा दिला. डोंगरी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 अन्वये बलात्काराच्या शून्य एफआयआरसह लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण – पॉक्सो (POCSO) कायद्या अंतर्गत कलम 4, 6, 8 अन्वये गुन्हा नोंदवला. पुढील तपासासाठी हे प्रकरण नेरूळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

दुसरीकडे, मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीच्या एका मित्राने वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्याने या पार्टीसाठी मुलीलादेखील बोलावलं होतं. ते सर्व मढ परिसरातील हॉटेलबाहेर भेटले. त्यांनी तिथे वाढदिवस साजरा केला. ते त्या ठिकाणी गाडीतून पोहोचले होते. त्यांनी केक कारमध्ये ठेवून वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस साजरा केल्यानंतर मुलीच्या दोन इन्स्टाग्राम मित्रांनी गाडीच्या आत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती जागा सोडल्यानंतर मुलगी मालाड भागातील एका मित्राच्या घरी गेली. पण तिथे त्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी तिथल्या घरातून कसंबसं बाहेर पडली. ती दुसर्‍या मित्राच्या घरी गेली. तिथे त्याही मित्राने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

इन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

वाढदिवसाच्या दिवशी विश्वासघात ! जंगलात नेऊन बलात्कार, प्रियकराने असं का केलं? तरुणीला हुंदका

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI