AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढदिवसाच्या दिवशी विश्वासघात ! जंगलात नेऊन बलात्कार, प्रियकराने असं का केलं? तरुणीला हुंदका

काही तरुणांना प्रेमाचा खरंच अर्थ गवसलेला नाही (Youth raped girlfriend and share offensive photos and videos)

वाढदिवसाच्या दिवशी विश्वासघात ! जंगलात नेऊन बलात्कार, प्रियकराने असं का केलं? तरुणीला हुंदका
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 4:22 PM
Share

चंद्रपूर : काही तरुणांना प्रेमाचा खरंच अर्थ गवसलेला नाही. प्रेमात फार मोठा त्याग असतो, एकमेकांची काळजी घेणं असतं, एकमेकांना समजून घेणं असतं. तसेच भांडण झाल्यावर तात्पुरता रुसवा फुगवा असतो. उलट अशा भांडणांमुळे दुरावा येतो. या दुराव्यामुळे एकमेकांची किंमत कळते. त्यानंतर दोघे मनाने आणखी जवळ येतात. त्यांच्यातील प्रेम आणखी जास्त घट्ट होतं. मात्र, काही तरुण प्रेमातही विकृत कृत्य करतात. आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत, जोडीदारासोबत किळसवाणं कृत्य करतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत केलेलं घृणास्पद कृत्य. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. तरुण आपल्या प्रेयसीसोबत इतकं खालच्या दर्जाचं आणि निघृणपणे वागूच कसा शकतो? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केलाय (Youth raped girlfriend and share offensive photos and videos).

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात घडली आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या सन्मुखसिंग बुंदेल या तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत किळसवाणं आणि संतापजनक कृत्य केलं आहे. आरोपी सन्मुखसिंग बुंदेल याने प्रेयसीला वाढदिवसाचं गिफ्ट देतो सांगून शहरालगत असलेल्या कारवा जंगलात नेलं. त्यानंतर नराधमाने तिच्यावर तिथे बलत्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने या सर्व कृत्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर त्याने फेसबुकवर एक फेक आयडी बनवून बलात्काराचे फोटो, व्हिडीओ शेअर केले. या संतापजनक कृत्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपीने असं का केलं?

आरोपी सन्मुखसिंग पीडित मुलीला सतत जातीवरुन अपमानास्पद बोलायचा. पीडितेला वाईट वाटेल असे शब्द उच्चारायचा. त्यामुळे तिने आरोपीला लग्नाला नकार दिला होता. याच नकाराच्या रागात आरोपीने पीडितेवर सूड उगवण्याच्या हेतून संबंधित कृत्य केलं. संबंधित घटना ही शुक्रवारी (4 जून) घडली.

पीडितेची पोलिसात तक्रार

संबंधित प्रकाराचे व्हिडीओ आणि फोटो शेअर झाल्यानंतर पीडितेला याबाबत माहिती मिळाली. पीडितेने थेट पोलिसात तक्रार केली. पीडितेच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी तपास करत पुरावे गोळा केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या (Youth raped girlfriend and share offensive photos and videos).

हेही वाचा : ’55 लाख रुपये द्या, अन्यथा बँक उडवून देईन’, वर्ध्यात सुसाईड बॉम्बरची धमकी देऊन पैशांची मागणी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.