AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिंचेच्या झाडामागे दबा धरला, मंदिरात जाताना बिल्डरची पहाटे तीन वाजता हत्या, विरारमध्ये खळबळ

निशांत कदम यांची निर्घृणपणे हत्या करुन आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. विरार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना केले आहे

चिंचेच्या झाडामागे दबा धरला, मंदिरात जाताना बिल्डरची पहाटे तीन वाजता हत्या, विरारमध्ये खळबळ
विरारमध्ये बिल्डरची हत्या
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 06, 2021 | 10:47 AM
Share

विरार : विरारमध्ये बांधकाम व्यावसायिकाची धारदार हत्याराने वार करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. निशांत कदम (वय 31) असे हत्या झालेल्या बिल्डरचे नाव आहे. हत्या करून आरोपी फरार झाले आहेत. आरोपींची ओळख पटली नसून, हत्येचे कारणही अद्याप स्पष्ट झाले नाही.

नेमकं काय घडलं?

विरार पूर्व फुलपाडा परिसरातील गांधी चौक येथे सोमवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. निशांत हे पहाटे पापडखिंड येथील मंदिरात पूजेसाठी जात होते. यावेळी चौधरीवाडी सहकार नगर येथील एकता कम्पाउंडच्या बाजूला चिंचेच्या झाडाजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले.

निशांत कदम यांची निर्घृणपणे हत्या करुन आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. विरार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना केले असल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.

जेलमधून सुटलेल्या जावयाकडून सासूची हत्या

दुसरीकडे, तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तरुणाने आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 42 वर्षीय जावयाने मुंबईत येऊन आपल्या सासूबाईंचा जीव घेतला. बायकोचा ठावठिकाणा सांगण्यास सासूने नकार दिल्याच्या रागातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आरोपी अब्बास शेखला दरोडा टाकल्याच्या प्रकरणात 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गेल्या आठवड्यात त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका झाली. दोन दिवसांनंतर त्याने मुंबई गाठली. पत्नीचा नवा पत्ता जाणून घेण्यासाठी शेख गेल्या आठवड्यात दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सासूच्या घरी गेला होता.

डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार

सासूने तुरुंगाबाहेर आलेल्या जावयाला लेकीचा पत्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे घरातच दोघांमध्ये मोठा वादविवाद झाला. त्यानंतर, चिडलेल्या जावयाने घरातच तिच्या डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. वृद्ध महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्यामुळे मुंबईतील विलेपार्ले भागात गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडाली होती.

हरियाणातील सामूहिक हत्याकांडाचा उलगडा

दरम्यान, हरियाणाच्या रोहतकमधील प्रॉपर्टी डीलर प्रदीप मलिक उर्फ बबलू पहलवान, त्याची पत्नी बबली, मुलगी तमन्ना उर्फ ​​नेहा आणि सासू रोशनी यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलगा अभिषेकच्या समलैंगिक संबंधांना कुटुंबाने विरोध केल्याने आणि सेक्स चेंज ऑपरेशनसाठी पैसे न दिल्याने त्याने चौघांची हत्या केल्याचा आरोप आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या :

येरवडा जेलमधून सुटल्यावर मुंबई गाठली, डोक्यात फरशी घालून सासूची हत्या

सेक्स चेंज ऑपरेशनसाठी पैसे न दिल्याचा राग, गे पार्टनरच्या साथीने हत्या, हरियाणातील सामूहिक हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा

Follow Us
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिफावयर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिफावयर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...